no images were found
न्यायप्रिय मुख्यमंत्र्यांनी योग्य न्याय केला-हेमंत पाटील : पार्थ पवार प्रकरण; कारवाईचे समर्थन
पुणे, : राज्यात एकामागोमाग भूखंड घोटाळ्यांची प्रकरणे उघडकीस येत असताना, पुण्यातील महार वतन जमीन खरेदी-विक्री प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायप्रियतेचा आदर्श ठेवत योग्य निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील जमीन व्यवहार रद्द करण्याच्या कारवाईचे स्वागत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी शनिवारी (दि. ८) केले.
पाटील म्हणाले की,या निर्णयामुळे पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे.दुय्यम निबंधक कार्यालयाने व्यवहार रद्द करण्यासाठी सुमारे २१ कोटी रुपये भरण्याची अट लावली आहे. या व्यवहारात जवळपास ६ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क बुडवण्यात आले होते.आता या निर्णयानंतर शासनाला तीनपट अधिक महसूल मिळेल,असे पाटील म्हणाले.या प्रकरणात सरकार ने नेमलेल्या उच्च स्तरीय चौकशी समिती मुख्यमंत्र्यांच्या व्हिजन नुसार न्यायसुसंगत अहवाल सादर करेल,असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर व्यवहार पुन्हा घडू नयेत आणि सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिक कठोर पावले उचलावीत तसेच महार, रामोशी आणि पाटील वतनाच्या जमिनींचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, अशी मागणी हेमंत पाटील यांनी सरकारकडे केली.