Home ऐतिहासिक जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; पोवाड्याच्या सादरीकरणाने शिवरायांच्या पराक्रमाला उजाळा

जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; पोवाड्याच्या सादरीकरणाने शिवरायांच्या पराक्रमाला उजाळा

1 second read
0
0
15

no images were found

 जिल्हाधिकारी कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी; पोवाड्याच्या सादरीकरणाने शिवरायांच्या पराक्रमाला उजाळा

कोल्हापूर: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे राज्यगीत गायनाने करण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी आणि करवीरच्या प्रांत अधिकारी मोसमी चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या स्मृतीस वंदन केले.

या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे शाहीर आझाद नाईकवाडी यांनी सादर केलेला पोवाडा. आपल्या पहाडी आवाजात त्यांनी शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास जिवंत केला, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला होता. शिस्तबद्ध नियोजन आणि शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याच्या संकल्पाने हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In ऐतिहासिक
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…