Home गौरव सन्मान महाराष्ट्राच्या विश्वविजेत्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्‍येकी २.२५ कोटीचे बक्षिसाने सन्‍मान

महाराष्ट्राच्या विश्वविजेत्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्‍येकी २.२५ कोटीचे बक्षिसाने सन्‍मान

27 second read
0
0
28

no images were found

महाराष्ट्राच्या विश्वविजेत्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्‍येकी २.२५ कोटीचे बक्षिसाने सन्‍मान

मुंबई ः ऐतिहासिक विश्वविजेत्या भारतीय संघात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणा-या महाराष्ट्राच्या क्रिकेटपटू स्मृति मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज,राधा यादव यांचा या अद्वितीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येकी रोख रु.२.२५ कोटी रुपयांचा धनादेश देऊन  आज गौरविण्यात आले.

       मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्‍या हस्‍ते शाल, भेटवस्‍तू व धनादेश देऊन स्मृति मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज,राधा यादव यांच्‍यासह ऐतिहासिक विश्व विजयाचे शिल्पकार भारतीय संघाचे क्रीडा मार्गदर्शक अमोल मुजुमदार यांचा रोख रु.२२.५० लक्ष व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.अ‍ॅड.माणिकरावजी कोकाटे, मंत्री, माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री .ना.आशिष शेलार मंत्री, क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले या उपस्थित होत्या.

वैयक्‍तिक क्रिकेटपटूंना सर्वाधिक रक्‍कम देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिलेच राज्‍य ठरले आहे. याप्रसंगी क्रिकेट संघाच्या सपोर्टिंग स्टाफसाठी प्रत्येकी 11 लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणाही मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी केली

भारतीय महिला क्रिकेट संघाचा वरिष्ठ स्तरावरील हा पहिलाच आयसीसी विश्वचषक विजय असून, या देदीप्यमान यशामुळे जागतिक स्तरावर भारताचा व पर्यायाने महाराष्ट्र राज्याचा गौरव झालेला आहे. असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्‍हणाले की  महिला विश्वचषक विजेत्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने झालेला सन्मान सोहळा हा केवळ एक अभिनंदनपर कार्यक्रम नव्हता, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात महाराष्ट्राच्या महत्त्वपूर्ण आणि वाढत्या भूमिकेची अधिकृत नोंद आहे. स्मृती मंधाना, जेमिमा रोड्रिग्ज, राधा यादव आणि प्रशिक्षक अमोल मजूमदार यांच्या रूपाने महाराष्ट्र राज्य देशाच्या क्रीडा नकाशावर आपला ठसा निश्चितपणे उमटवत आहेत.  

राज्याने दिलेले २.२५ कोटी रुपयांचे भव्य आर्थिक प्रोत्साहन अत्यंत स्तुत्य आहे आणि महिला क्रीडा क्षेत्रातील आर्थिक असमानता दूर करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या निर्णयामुळे महिला खेळाडूंना व्यावसायिक सुरक्षितता मिळण्यास मदत होईल आणि पुढील पिढीला खेळात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नाव उजळवणाऱ्या क्रीडापटूंचा सत्कार करण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन वचनबद्ध असल्‍याची क्रीडामंत्री अ‍ॅड.माणिकरावजी कोकाटे यांनी सांगितले. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…