no images were found
संकट वाढणार!
या आठवड्यात एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’ आणि ‘भाबीजी घर पर है’मध्ये पात्रं विलक्षण स्थितींमध्ये अडकणार आहेत, ज्यामुळे अधिक मोठे संकट ओढावणार आहेत. विनोदी ट्विस्ट्ससह हसून-हसून लोटपोट होण्यास सज्ज राहा. एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’च्या आगामी एपिसोडबाबत गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ”खोदीची (शरद व्यास) स्कूटर हरवल्यानंतर दरोगा हप्पू आणखी एका दुविधेत सापडतो. हप्पूच्या घरातून स्कूटर हरवल्याने रागावलेला खोदी हप्पूचा खूप अपमान करतो आणि संपूर्ण दोष त्याच्यावर टाकतो. दुःखात अधिक भर म्हणजे खोदीने राजेशला (गीतांजली मिश्रा) मधुर गाणे गाण्याची विनंती केली होती, बदल्यात तिला कुंदन नेकलेस देण्याचे आश्वासन दिले होते. हे गुपित कटोरी अम्माला (हिमानी शिवपुरी) देखील माहित नसते. योगायोगाने, ज्या दिवशी राजेश त्याची विनंती पूर्ण करते त्याच दिवशी स्कूटर गायब होते. खोदीशी संवाद साधण्याचा एकमेव मार्ग स्कूटर असल्याने राजेश हप्पूवर स्कूटर शोधण्यासाठी दबाव आणू लागते, तर रणबीर (सोम्या आझाद) आणखी तणाव वाढवतो, तो विंटेज (जुन्या) स्कूटर आणि बाइक आवडणाऱ्या मुलीला प्रभावित करण्यासाठी धडपडत असतो. लवकरच सत्य उघडकीस येते की हप्पूमुळे स्कूटर हरवली आहे. दारूच्या नशेत तो आणि बेनी (विश्वनाथ चॅटर्जी) एका रात्री स्कूटर बेवारस सोडून जातात आणि स्कूटर कुठे पार्क केली होती हे पूर्णपणे विसरून जातात. दरम्यान, कमिशनर रेशम पाल (किशोर भानुशाली) पत्नीला सोडून त्याच्या प्रेयसीसोबत पळून जात असतो, तेव्हा तो सोडून दिलेल्या स्कूटरवर अडखळतो आणि त्याच स्कूटरवरून पळून जातो. पळून जात असताना ते चुकून सोनूला (संजय चौधरी) धडकतात, जो कमिशनरला पाहतो आणि दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशनला घटनेची तक्रार करतो. घाबरून, कमिशनर आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करतो. कॉन्स्टेबल मनोहर (नितीन जाधव) त्याला कळवतो की सोनू मलायकाचा (सोनल पनवार) मित्र आहे. हताश होऊन कमिशनर मलायकाला आमिष देतो की सोनूला तक्रार मागे घेण्यास पटवून दिल्यास तिला तिची पोस्ट परत मिळेल. पण, कर्तव्यदक्ष मलायका सोनूला तक्रार मागे न घेण्यास सांगते आणि कमिशनरचे सत्य उघडकीस आणते. हप्पू आणि बेनी हरवलेल्या स्कूटरचा शोध सुरू ठेवतात. हप्पू अखेर स्कूटर घरी परत आणून कटोरी अम्मा, राजेश आणि खोदीच्या रागापासून स्वतःला वाचवू शकेल का?”
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या आगामी एपिसोडबाबत शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी म्हणाल्या, ”रात्री एकत्र जेवणादरम्यान विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख) आणि मनमोहन तिवारी (रोहिताश्व गौड) यांच्यात होणारा हलकाफुलका संवाद त्यांच्या नेहमीच्या तू तू मैं मैं मध्ये बदलतो. भांडणादरम्यान विभुती स्पष्टपणे सांगतो की त्याला तिवारीचे सर्व गुपित माहीत आहेत. हे विधान अंगूरीच्या (शुभांगी अत्रे) मनात अडकते आणि ती तिवारीवर सत्य उघड करण्यासाठी दबाव आणू लागते, पण तो तिला कोणतेही उत्तर देण्याचे टाळतो. दरम्यान, मोहल्ल्यात चर्चा सुरू असते की चाचा (अनुप उपाध्याय) यांनी एक यूएफओ पाहिला आहे आणि मॉडर्न कॉलनीमध्ये एलियन असू शकतात. या चर्चेचा फायदा घेत अंगूरी विभुतीला तिच्या लड्डू के भैय्याबद्दल कोणती गुपित माहित आहेत हे विचारते. अंगूरीला प्रभावित करण्यासाठी विभुती विनोदाने दावा करतो की तिवारी एक एलियन आहे. विभुतीवर विश्वास ठेवत अंगूरी स्वत:च्या पतीवर बारकाईने लक्ष ठेवू लागते. तिवारीला याबाबतसमजते तेव्हा तो खेळ उलट करण्याचा निर्णय घेतो आणि असे कृत्य करतो की विभुती व अंगूरी दोघेही पूर्णपणे गोंधळून जातात. शेवटी सत्य उघडकीस येईल का?”