no images were found
नेस्ले इंडिया कडून जीएसटी दरकपातीचा लाभ थेट ग्राहकांना देण्याची घोषणा
नेस्ले इंडियाने अलीकडेच भारत सरकारने जाहीर केलेल्या गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) दरातील बदलाचे स्वागत केले आहे. कंपनीने सांगितले आहे की हा लाभ 22 सप्टेंबर 2025 पासून थेट ग्राहकांना दिला जाईल.
श्री. मनीष तिवारी, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, नेस्ले इंडिया म्हणाले, “जीएसटी दर कमी होणे हे भारतातील ग्राहकांसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. यामुळे खप वाढेल आणि अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल. नेस्ले गेली 113 वर्षांपासून भारताचा अविभाज्य भाग आहे आणि आमच्यासाठी ग्राहक नेहमीच सर्वात महत्त्वाचे राहिले आहेत. ग्राहकांची सेवा करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे आणि पुढेही त्यांच्या हितासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”
पारदर्शकता राखण्यासाठी नेस्ले इंडियाने ही माहिती राष्ट्रीय व प्रादेशिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली आहे. तसेच हा लाभ घाऊक विक्रेते, वितरक आणि किरकोळ विक्रेते यांच्यापर्यंतही पोहोचवला आहे.