Oplus_131072
no images were found
स्टार एअर तर्फे आपल्या नेटवर्कमध्ये विस्तार
कोल्हापूर,: संजय घोडावत समुहाचा एव्हिएशन व्यवसाय असलेल्या स्टार एअर ने आपल्या नेटवर्कच्या विस्ताराची घोषणा केली आहे. एक व्यापक योजनेचा भाग म्हणून कोल्हापूर आणि बेळगावी यांसारख्या शहरांमधून हवाई संपर्क व्यवस्था अधिक बळकट केली जाईल. एअरलाईन तर्फे कोल्हापूर वरून मुंबई,अहमदाबाद आणि बंगळुरू येथे नवीन व सुधारित सेवा सुरू करण्यात आल्या असून या मार्गांवर किशनगड आणि इंदौर हे दोन महत्त्वाचे संपर्क प्रस्थापित करण्यात आले आहेत.याचबरोबर बेळगावी आणि मुंबई या दरम्यान दैनंदिन थेट सेवा सुरू करण्यात आली आहे.