no images were found
‘कहानी हर घर की’ चार व्हीलचेअरवर असलेल्या योद्ध्यांचा सन्मान करतात !
झी टीव्हीवरील ‘कहानी हर घर की’ चे सूत्रसंचालन जुही परमार करत असून हा शो खऱ्या घरांमध्ये जाऊन त्या कथा उलगडत आहे ज्या अनेकदा शांततेच्या आड दडलेल्या असतात. संवेदनशीलतेने आणि आपुलकीने, जुही धैर्य, जिद्द आणि एकतेच्या या कहाण्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. त्या आपल्याला आठवण करून देतात की अडचणींनी शरीरावर परिणाम होऊ शकतो, पण त्यामुळे मानवी आत्म्याची ताकद कधीच मोडू शकत नाही.
आजच्या भागात जुही परमार चार विलक्षण महिलांची प्रेरणादायी कहाणी सांगत आहे – मुंबईची प्रिया, सुरतची पूजा चौधरी, बरेलीची निशा गुप्ता आणि भारती. त्यांचे जीवन संघर्ष, ताकद आणि जिद्दीने एकमेकांशी जोडलेले आहे. नियतीने त्यांना व्हीलचेअरवर बसवले असले तरी प्रत्येक महिलेने शारीरिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत आपला स्वतंत्र मार्ग निर्माण केला आहे.
प्रियाने 17 व्या वर्षी अपघातात दोन्ही पाय आणि एक हात गमावला, ती फक्त 19 वर्षांची असूनही अफाट जिद्दीने सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत आहे. पूजा आणि भारती या दोघीही फूड डिलिव्हरीचे काम मनापासून करतात आणि आपल्या व्यवसायातील वेगवान मागण्या खंबीरपणे पूर्ण करतात. निशा स्वतः एक कुशल खेळाडू आहे, ती त्या दोघींना मार्गदर्शन आणि आधार देते, आपल्या अनुभवातून त्यांना ताकद पुरवते. एकत्रितपणे त्या आत्मनिर्भरता, सबलीकरण आणि परस्पर सहकार्याची खरी ताकद दाखवतात.
जुही परमार म्हणाल्या, “एक स्त्री आणि एक आई म्हणून नवरात्री हा सण माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे कारण हा सण देवीच्या नऊ रूपांचा सन्मान करणारा आहे. यंदा ‘कहानी हर घर की’ मधील या सामर्थ्यशाली कहाण्या ऐकताना मला पुन्हा जाणवलं की प्रत्येक स्त्रीच्या आत ‘माँ दुर्गा’ असते. आयुष्याने कल्पनेपलीकडच्या परीक्षा घेतल्या तरी त्या पुन्हा उभ्या राहतात – भीतीला हरवणाऱ्या धैर्याने, जखमा भरून काढणाऱ्या सौंदर्याने आणि जिद्दीने विजय मिळवतात. स्त्रिया फक्त जगण्यासाठी लढणाऱ्या नाहीत; त्या खऱ्या योद्ध्या आहेत, ‘शक्ती’चे सजीव रूप आहेत, ज्या आपल्याला स्वतःच्या संघर्षांवर मात करण्याची प्रेरणा देतात. या नवरात्रीत मी प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याला वंदन करते आणि त्यांचे अस्तित्व साजरा करते – त्या आपल्या खऱ्या देवी आहेत.”
संवेदनशीलता आणि समजूतदारपणाने जुही परमार या हृदयाला भिडणाऱ्या भागाचे सूत्रसंचालन करतात आणि प्रेक्षकांना आठवण करून देतात की अपंगत्व म्हणजे असमर्थता नव्हे, खरी ताकद म्हणजे समावेशकता आणि एकमेकांना आधार देणे. आजच्या भागात ‘कहानी हर घर की’ हा प्रश्न विचारतो – या महिलांच्या विलक्षण प्रवासाने समाजाला त्यांच्या धैर्याची जाणीव होईल का तसेच सगळ्यांसाठी अधिक सुलभ अशी दुनिया निर्माण होईल का?