Home मनोरंजन ‘इत्ती सी खुशी’ आणि ‘पुष्पा इम्पॉसिबल’चा संगम

‘इत्ती सी खुशी’ आणि ‘पुष्पा इम्पॉसिबल’चा संगम

12 second read
0
0
51

no images were found

 ‘इत्ती सी खुशी’ आणि ‘पुष्पा इम्पॉसिबल’चा संगम

नवरात्रीच्या उत्सवी वातावरणात सोनी सब आपल्या प्रेक्षकांचे रंजन करण्यासाठी ‘पुष्पा इम्पॉसिबल’ आणि ‘इत्ती सी खुशी’ या दोन मालिकांना एकत्र आणून एक खास महासंगम सप्ताह सादर करत आहे. या महासंगमात पुष्पा (करुणा पांडे) आणि अन्विता (सुंबुल तौकीर खान) या दोन जबरदस्त महिला एकत्र येतील. त्या दोघी आपापल्या जीवनाचा कायापालट करणाऱ्या सत्यांचा सामना करत आहेत, ज्या सत्यामुळे त्यांचे जग हादरू शकते.

कथानक असे आहे की, आपला मुलगा अश्विन (समृद्ध बावा) सतत बंगळूरला जात असतो याबद्दल साशंक झालेली पुष्पा त्याचा शोध घेत-घेत खोताची वाडी या पत्त्यावर पोहोचते. पुष्पाचा संशय आणखी बळावतो, जेव्हा अश्विनच्या खिशात तिला कॅन्सरच्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन सापडते. आपला मुलगा त्याचा मोठा आजार आपल्यापासून लपवत असल्याची तिला शंका येते. याचा शोध घेताना जे सत्य तिच्या समोर येते, ते तिला हादरवून सोडते. अश्विन कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आपल्या पूर्वीच्या प्रेयसीसोबत दुहेरी आयुष्य जगत असल्याचे तिला समजते. दरम्यान, मालमत्ता कर न भरल्यामुळे अन्विताचे घर सील करण्यात येते आणि त्यामुळे तिचे जीवन अधांतरी झाले आहे. खोताची वाडी या ठिकाणी पुष्पा आणि अन्विता समोरासमोर येतात. अन्विताचा संघर्ष पाहून हेलावून गेलेली पुष्पा तिची बापोद्राशी (जयेश भारभाया) ओळख करून देते. अन्विताला त्याची मदत होईल अशी आशा तिला वाटते. तिचा हा आपलेपणा पाहून अन्विता भारावून जाते.

दुसरीकडे, अन्विताच्या व्यक्तिगत जीवनात आणखी एक वादळ आले आहे. संजय (ऋषी सक्सेना) एक पुरावा ठेवून विराट (रजत वर्मा)साठी एक सापळा रचतो आणि विराटचे सत्य उघडकीस आणण्यासाठी अन्विताला उद्युक्त करायचे ठरवतो. या गोंधळात, जेव्हा दिया अन्विताला एका डान्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करते तेव्हा आशेचा एक किरण दिसतो. बक्षीसाची रक्कम मिळाली, तर मालमत्ता कर भरता येईल अशी अन्विताला आशा वाटते. पण एक समस्या ही आहे की, स्पर्धा पार्टनर डान्सची आहे. संजयच्या सापळ्यातून वाचण्यासाठी विराट अचानक अदृश्य होतो त्यामुळे अन्विताला पुष्पासोबत जोडी बनवण्याखेरीज काहीच पर्याय राहात नाही.

अन्विता स्पर्धा जिंकून आपले घर वाचवू शकेल का? विराट संजयने रचलेल्या सापळ्यातून निसटू शकेल का? आणि पुष्पा अश्विनबद्दलचे सत्य स्वीकारू शकेल का?

या तीन-दिवसीय महासंगमात भरपूर नाट्य, सत्याचे खुलासे आणि भावनिक चढ-उतार असणार आहेत आणि पुष्पा व अन्विता या दोन सशक्त महिला लपलेल्या सत्याचा सामना करण्यास आणि संघर्षावर मात करण्यास सिद्ध आहेत.

    ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विताची भूमिका करणारी सुंबुल तौकीर खान म्हणते, “अन्विताच्या जीवनात एक मोठा कठीण प्रसंग येणार आहे. संजय आणि विराट यांच्याबद्दल समजल्यावर ती मूळापासून हलून जाईल हे स्वाभाविक आहे. पण यातूनच तिला स्वतःच्या बळावर उभे राहण्याचे सामर्थ्य देखील मिळेल. महासंगम एपिसोडचा एक भाग असणं हे आव्हानात्मक होतं पण तरी हा समाधान देणारा अनुभव होता, कारण त्यातून अन्विताचा चिवटपणा दिसून आला. व्यक्तिशः सांगायचे तर, करुणासोबत काम करताना खूपच मजा आली. आम्हाला दोघींना डान्स करायला आवडते. आणि मालिकेत एक दृश्य असे आहे, जेव्हा आम्हा दोघींना एकत्र डान्स करायचा होता. त्याचे शूटिंग करण्याचा अनुभव खूप मस्त होता. करुणा जबरदस्त आहे, मनमोकळी आहे आणि तिच्यासोबत काम करणे खरोखर आनंददायक आहे. त्यामुळे एकत्र शूटिंगचा अनुभव विशेष होता.”

       पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत पुष्पाची भूमिका करणारी करुणा पांडे म्हणते, “पुष्पा आपल्या कुटुंबासाठी एक भक्कम आधार आहे. पण अश्विनविषयीचे सत्य समजल्यानंतर ती हलून गेली आहे. हे एक भावनिक वादळ आहे, आईचे प्रेम आणि कठोर सत्य यामध्ये ती सापडली आहे. या महासंगम विशेष भागात काम करण्याचा अनुभव मस्त होता. विशेषतः सुंबुलसोबत काम करायला फारच आवडले. तिच्यासोबत काम करणे आनंददायक आहे. ती उत्साहाने सळसळत असते आणि ती सेटवर एक आपलेपणा घेऊन येते, ज्यामुळे सारे काही सहज होते.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …