Home शासकीय प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची विभागीय कार्यालयाची तपासणी ,कर्मचाऱ्यांचे अर्ध्या दिवसाचे वेतन कपात

प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची विभागीय कार्यालयाची तपासणी ,कर्मचाऱ्यांचे अर्ध्या दिवसाचे वेतन कपात

0 second read
0
0
129

no images were found

प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची विभागीय कार्यालयाची तपासणी ,कर्मचाऱ्यांचे अर्ध्या दिवसाचे वेतन कपात

कोल्हापूर,(प्रतिनिधी ): प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी नागरीकांच्या सोईसुविधा व त्यांच्या तक्रारीचे निराकरण तत्परतेने करण्यासाठी विभागीय कार्यालयात दोन दिवसांपुर्वी सहा.आयुक्तांची पुर्णवेळ नियुक्ती केली आहे. यावेळी सहा.आयुक्तांबरोबरच सर्व कर्मचाऱ्यांनी पुर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहणेचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सहा.आयुक्त विभागीय कार्यालयात पुर्णवेळ बसून आपले कामकाज करत आहेत. दुपारी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान व विभागीय कार्यालय क्रं.2 छत्रपती शिवाजी मार्केट येथील कार्यालयीन कामकाजाची आज पाहणी केली. या पाहणीवेळी प्रशासकांना विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदानकडील कनिष्ठ अभियंता अक्षय आटकर, अनिरुध्द कोरडे, कनिष्ठ लिपीक प्रतिक पाटील कार्यालयात उपस्थित नसलेचे आढळून आले. त्यामुळे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी या तीन कर्मचाऱ्यांचे अर्ध्या दिवसाचे विनावेतन केले आहे. यावेळी सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाने, उपशहर अभियंता महादेव फुलारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

राजेंद्रनगर व मोतीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई कोल्हापूर  : शहरातील राजेंद…