no images were found
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा पुन्हा एकदा मुंबई दौरा, राजकीय चर्चांणा उधाण
मुंबई: गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. यामध्ये भाजपच्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपासून राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप महत्वाच्या भूमिका पार पाडत आहे.अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्र दौरे वाढतं असल्याचे दिसले आहे. अमित शाह पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर असणार आहे.
राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं दिसत आहे. कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्प, जोडे प्रकल्प इत्यादी वाद सुरू आहेत. तर दुसरीकडे अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येत असून नेतृत्व बदलांच्या चर्चांना उधाण आलं आहे. अमित शाहांचा हा एप्रिल महिन्यातील दुसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. मात्र, अमित शाह हे त्यांच्या एका नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी मुंबई दौऱ्यावर येत असल्याचे स्पष्ट होत आहे.
दोन दिवसांपूर्वी अमित शाह हे नागपूर दौऱ्यावर येणार होते. परंतु पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रीय दुखवटा असल्यानं त्यांनी तो दौरा रद्द केला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या मुंबई दौऱ्यावरून तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे अमित शाहांचा हा दौरा किती महत्त्वाचा ठरेल. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.