no images were found
रिफायनरीविरोधातले आंदोलन स्थगित
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या माती परीक्षणाला स्थानिकांनी प्रचंड विरोध केला.पोलिसांनी मात्र त्यांना माती परीक्षण सुरु असलेल्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले. कोकणातल्या बारसू येथे सुरू असलेले रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी आंदोलन प्रकरणी बारसू रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अशोक वालम आणि विनेश वालम यांना अटक करून नंतर सशर्त जामिनावर सोडले. अशोक वालम यांना 31 मे पर्यंत जिल्हाबंदी आणि विनेश वालम यांना 31 मे पर्यंत तालुकाबंदी करण्यात आली आहे. अटक केलेल्या अनेक आंदोलकांना रात्री उशिरा सोडण्यात आले. यानंतर बारसू रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले. सध्या 3 दिवसांकरिता आंदोलन स्थगित केले आहे, पुढील निर्णय परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर घेतला जाईल, असे बारसू रिफायनरी विरोधी संघर्ष समितीने सांगितले.