no images were found
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी मुदतवाढ बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 14 ऑगस्ट तर कर्जदार शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
कोल्हापूर, : खरीप हंगाम 2025 मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै 2025 अशी होती. तथापि सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गत वर्षीच्या तुलनेत झालेला कमी सहभाग, शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नसणे, आधार व सीएससी सर्व्हरवरील व्यत्यय, जिल्ह्याच्या भूमीअभिलेख पोर्टलच्या तांत्रिक/सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांचा योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने या योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि. 14 ऑगस्ट 2025 व कर्जदार शेतकऱ्यांना दि. 31 ऑगस्ट 2025 पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सह संचालक बसवराज मास्तोळी यांनी दिली आहे.
सर्व शेतकऱ्यांनी पीएमएफबीवाय पोर्टल https :// pmfby.gov.in वर स्वतः शेतकऱ्यांनी तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांच्या मार्फत योजनेत सहभागाची नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, क्षेत्रिय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी या कार्यालयांशी संपर्क साधावा, असेही श्री. मास्तोळी यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.