no images were found
‘इत्ती सी खुशी’ – सुम्बुल तौकीर खान, वरुण बडोला आणि रजत वर्मा अभिनीत एक हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिका
~ 18 ऑगस्ट रोजी सुरू होत असलेल्या या मालिकेत अन्विता या आपल्या विस्कळित कुटुंबाची जबाबदारी वाहणाऱ्या एका सुजाण तरुणीची गोष्ट आहे ~
फील-गुड आणि कौटुंबिक मनोरंजन प्रदान करणारी सोनी सब वाहिनी आता ‘इत्ती सी खुशी’ ही एक वेधक आणि भावनाप्रधान कौटुंबिक मालिका घेऊन येत आहे, जी सर्व पिढ्यांच्या प्रेक्षकांना नक्की आपलीशी वाटेल. मुंबईच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या मालिकेत 21 वर्षीय अन्विताची गोष्ट आहे, जी आपल्या सहा भावंडांमध्ये सगळ्यात मोठी आहे आणि अनपेक्षितपणे ती आपल्या कोसळणाऱ्या कुटुंबाचा आधार बनली आहे.
अन्विताचे वडील दारूच्या व्यसनाशी झगडत आहेत आणि आई त्यांना सोडून गेली आहे. अशा वेळी अन्विताच आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते आहे. आपल्या भावंडांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तिने स्वतःचे शिक्षण आणि आशा-आकांक्षा बाजूला सारल्या आहेत. तिचा दैनंदिन अस्तित्वाचा संघर्ष, मूक बलिदान आणि तिच्यातील प्रेम आणि चिकाटी या मालिकेत हलक्या-फुलक्या स्वरूपात बघायला मिळेल. वरुण बडोला 6 वर्षांनी पुन्हा टेलिव्हिजनवर परतत आहे. तो या मालिकेत सुहास हा अन्विताच्या बेकार पित्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या सोबत मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत सुम्बुल तौकीर खान (त्याच्या मुलीच्या- अन्विताच्या भूमिकेत) आणि आणि रजत वर्मा (अन्विताचा प्रियकर विराटच्या रूपात) आहेत. मालिकेच्या मोठमोठ्या क्रू सदस्यांमध्ये एक नाव आहे, राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांचे. या मालिकेसाठी क्रिएटिव्ह फोर्स म्हणून त्यांना घेण्यात आले आहे.
रोझ ऑडिओ व्हिज्युअल्स द्वारा निर्मित ‘इत्ती सी खुशी’ हे ‘शेमलेस’ या प्रसिद्ध मालिकेचे भारतीय रूपांतरण आहे. शेमलेस ही मुळात कंपनी पिक्चर्स आणि UK चा लेखक पॉल अबॉट यांनी अधिकार धारक ऑल3मीडिया इंटरनॅशनल यांच्या सहयोगाने विकसित केलेली मालिका आहे. ही मूळ मालिका चॅनल 4 वर गाजली होती, तिला BAFTA TV अवॉर्ड्समध्ये बेस्ट ड्रामा सिरीज या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले होते. त्याच्या अमेरिकन आवृत्तीला देखील खूप वाखाणण्यात आले होते. या मालिकेने अनेक प्राइम-टाइम एमी नामांकने आणि चार पुरस्कार पटकावले होते. UK आणि US च्या या दोन्ही रूपांतरणात आकर्षक आणि प्रतिभावान अभिनेत्यांचा संच होता.
टिप्पण्या :सोनी सबचे बिझनेस हेड अजय भालवणकर
“‘शेमलेस’ या अलीकडच्या काळात अत्यंत गाजलेल्या आणि यशस्वी आंतरराष्ट्रीय काल्पनिक मालिकेचे वेधक आणि सांस्कृतिक बूज ठेवून केलेले रूपांतरण ‘इत्ती सी खुशी’ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. जागतिक टेलिव्हिजन इतिहासात प्रदीर्घ चाललेल्या मालिकांपैकी एक असलेली ही मालिका अत्यंत यशस्वी ठरली होती, जिचे रूपांतरण 31 देशांमध्ये करण्यात आले. रोझ ऑडिओ व्हिज्युअल्स आणि ऑल3मीडिया इंटरनॅशनल यांच्या सहयोगाने ही गाजलेली मालिका भारतीय प्रेक्षकांसमोर घेऊन येणे हा सोनी सब साठी एक लक्षणीय टप्पा आहे. सर्वस्पर्शी कथानक आणि भावनिक कथा मांडणी असलेली ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका आपल्या प्रेक्षकांना खूप आवडेल आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक सुंदर भाग बनून जाईल अशी आम्हाला खात्री वाटते.”
रोझ ऑडिओ व्हिज्युअल्सचे निर्माते आणि संस्थापक गोल्डी बहल
“‘इत्ती सी खुशी’ एक अशी आगळीवेगळी मालिका आहे, जी कोणत्याही भव्य दिव्य कृत्याबद्दल नाही किंवा कोणतीही जबरदस्त कथा सांगत नाही. ही अन्विताच्या दैनंदिन जीवनातील विनम्र कर्तृत्वाची गोष्ट आहे, जी आसपास सारे काही कोसळत असताना, ‘जीवनातील ‘इत्ती सी खुशी’ च्या शोधात आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवते. मी अशा कुटुंबात वाढलो आहे, जिथे मला स्वतःला अन्विताप्रमाणेच अनेक भावंडे होती. त्यामुळे या कथेचा आणि व्यक्तिरेखांचा भावनिक पोत मी समजू शकतो, त्यामुळेच माझ्यातील निर्माता या कथानकाकडे आकृष्ट झाला. एका जागतिक कथानकाची नक्कल करणे इतकेच यातील आव्हान नव्हते, तर आपल्या भाषेत त्याचा अनुवाद करणे आणि आपल्या मातीचा गंध त्याला बहाल करणे हे मोठे काम होते. त्याबद्दल मी सोनी सबला श्रेय देतो. त्यांनी आम्हाला हे जग भारतीय प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवण्याची संधी दिली, जे अस्सल भारतीय आणि आपल्या संस्कृतीत रुजलेले जग आहे.”
ऑल3मीडिया इंटरनॅशनलच्या EVP सबरीना डुगेट
“भारतातील सोनी सबसाठी आमचे पार्टनर रोझ ऑडिओ व्हिज्युअल्स अशी गाजलेली मालिका निर्माण करत असल्याचे पाहून आम्ही रोमांचित आहोत. त्यांच्या टीमने ‘शेमलेस’मधील ताकदीच्या व्यक्तिरेखा मुंबईच्या पार्श्वभूमीवर जिवंत करण्याची सूचकता दाखवली आहे. ही मालिका साकार करण्यात गोल्डी बहल, मितेश पटेल आणि रोझ ऑडिओच्या अप्रतिम टीमने जी निष्ठा आणि कौशल्य दाखवले आहे, ते कौतुकास्पद आहे. भावी प्रोजेक्ट्समध्ये देखील आमचा सहयोग असाच चालू राहील अशी आम्हाला आशा आहे.”