no images were found
न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचा उंचगाव येथे स्वच्छता उपक्रम यशस्वीरित्या संपन्न.
कोल्हापूर (प्रतिनिधी):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी व उंचगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत उंचगाव येथे स्वच्छता सप्ताहा निमित्त दि. १४ ऑगस्ट रोजी स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या अंतर्गत महाविद्यालयाच्या डी फार्मसी व बी फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मंगेश्वर मंदिर परिसर, गाव तलाव येथे परिसराची स्वच्छता करून लोकांमध्ये जन जागृती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तसेच परिसरात स्वच्छता न बाळगल्यास त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो. याविषयी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त सरपंच मधुकर चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नामदेव वाईगडे, श्री रशीद पठाण तसेच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले. सदरचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. वैशाली यादव, प्रा. काजल मोहिते, प्रा. अंजली महाडिक, प्रा. साक्षी माने, प्रा. राजेश कुलकर्णी व सौ. सीमा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.