no images were found
सलाईनच्या अवस्थेत तिने दिला बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर
सोलापूर : आजारी असलेल्या बारावीच्या विद्याथ्यानीने बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर हा सलाईन लावून दिला.परिक्षा बुडू नये, म्हणून करमाळा तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात परीक्षार्थी कु. प्रेरणा बाबर या विद्यार्थीने ॲम्बूलन्समध्ये बसून थेट परिक्षा केंद्र गाठून परिक्षेसाठी हजर राहिली.
सध्या बारावीच्या परिक्षा चालू आहेत. परिक्षा काळामध्येच प्रेरणा ही आजार पडली. तिच्यावर उपचार चालू होते. दरम्यान बुधवारी तिचा रसायन शास्त्र विषयाचा पेपर होता. बारावीचे महत्वाचे वर्ष असल्यामुळे पेपर चुकवायचा नाही, अशा निर्णय घेत प्रेरणा ही खाजगी हॉस्पिटल मधून तिला पेपर देण्यासाठी ॲम्बुलन्स मधून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर आणण्यात आले. विशेष म्हणजे नाकाला ऑक्सिजनची नळी व हाताला सलाई लावुन या विद्यार्थीनीने पेपर दिला आहे.
विद्याथ्यानीची ही धडपड पाहून केंद्र संचालकांनी योग्य बैठक व्यवस्था केली. तिने सलाईन घेत पेपर लिहीला. तिचा पेपर चालू असताना वैद्यकीय टीमने देखील काळजी घेतली. आजारी असताना देखील परीक्षा दिल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते.
हा पेपर सुरु असताना डॉ. रविकिरण पवार, डॉ. कविता कांबळे, डॉ. अमोल घाडगे, डॉ. महेश अभंग, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. वर्षा करंजकर, डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये परिचारिका राजश्री पाटील यांनी उपचार चालू ठेवले. पेपर संपल्यानंतर पुन्हा प्रेरणा बाबर हिला उपचारासाठी येथिल खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.