
no images were found
टीम इंडियाच्या महिला खेळाडूंना मिळणार मॅचचं मानधन
मुंबई : क्रिकेट क्षेत्रातील महिला खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केलेल्या घोषणेमुळे टीम इंडियाच्या महिला खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या महिला खेळाडूंना पुरुषांप्रमाणेच मॅचचे मानधन मिळेल अशी महत्वाची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली. जय शाह यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे. क्रिकेट क्षेत्रातील महिला खेळाडूंसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.