Home सामाजिक जोतिबाच्या पालखीचा मानकरी सुंदर हत्तीचा कर्नाटकात दुर्दैवी अंत

जोतिबाच्या पालखीचा मानकरी सुंदर हत्तीचा कर्नाटकात दुर्दैवी अंत

0 second read
0
0
57

no images were found

जोतिबाच्या पालखीचा मानकरी सुंदर हत्तीचा कर्नाटकात दुर्दैवी अंत

कोल्हापूर : दख्खनचा राजा लाखोंचा कुलदैवत जोतिबा देवाचा मानकरी असलेल्या ‘सुंदर’ हत्तीचा कर्नाटकमधील बनारगट्टा पार्कमध्ये २७ ऑगस्ट रोजी निधन झाले. सुंदर हत्तीच्या निधनानंतर महाराष्ट्र ते जागतिक पटलापर्यंत दखल घेतल्या गेलेल्या वादग्रस्त अध्यायाची एका दशकानंतर अखेर झाली आहे.
संस्थान काळात जोतिबा देवाला दोन हत्ती होते. त्यानंतर अनेक वर्ष हत्ती नव्हता म्हणून सुंदर हत्तीला वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीने आमदार विनय कोरे यांच्याकडून जोतिबा देवस्थानला भेट देण्यात आला होता. तथापि, सुंदर हत्तीचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण २०१२ 2012 मध्ये न्यायप्रविष्ठ झाले होते. पेटा संस्थेने दिलेला लढा, २१ महिने चाललेली मोहीम तसेच महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते माधुरी दीक्षितपर्यंत सेलिब्रेटींनी दिलेला पाठिंबा यामुळे हे प्रकरण जगाच्या पाठीवर चांगलेच वादग्रस्त झाले होते.
पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स ने आरोप केला होता की, वारणा समूहाने भेट दिलेल्या सुंदर हत्तीचे २००७ पासून जोतिबा देवस्थानकडून शोषण सुरु आहे. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. कालांतराने सन २०१२ मध्ये, राज्य सरकारने सुंदर हत्तीला अभयारण्यात सोडण्याचे आदेश दिले होते. तथापि, या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही.
त्यानंतर पेटाने सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. विनय कोरे, यांनीही सरकारी आदेश बाजूला ठेवण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली. दरम्यान, सुंदरला ज्योतिबा मंदिराच्या आवारातून वारणा नगर येथे हलवण्यात आले.
सुंदर हत्तीच्या सुटकेचा निर्णय न्यायालयात गेल्यानंतर विनय कोरे यांना लासा मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने सुंदर हत्तीला बंगळूर येथील अभयारण्यात तत्काळ हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आणि 2012 मध्ये मंजूर केलेला सरकारी आदेश बाजूला ठेवण्याची मागणी करणारी विनय कोरे यांची याचिका फेटाळली. मुंबई उच्च न्यायालयाच्या व्ही. एम. कानडे आणि ए. के. मेनन यांच्या खंडपीठाने सुंदरच्या सुटकेचा आदेश दिला होता. त्यामुळे पेटाने हा न्यायालयीन लढा जिंकला. सुंदरच्या सुटकेसाठी पॉल मॅककार्टनी, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, पामेला अँडरसन, अर्जुन रामपाल, आर. माधवन, गुलशन ग्रोव्हर यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी आवाज उठवला होता.
सुंदरच्या सुटकेसाठी तब्बल 21महिने भारतासह जगाच्या पाठीवर मोहीम सुरु होती.अशा प्रदीर्घ वादाची किनार लाभलेल्या सुंदर हत्तीचे अखेर 27 ऑगस्ट रोजी कर्नाटकमधील बनारगट्टा पार्कमध्ये निधन झाले. मृत्यू होऊनही कोणतीच माहिती वारणा उद्योग व शिक्षण समूहाला तसेच जोतिबा देवस्थानला कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याने भाविकांसह वारणा खोऱ्यात संताप व्यक्त झाला. सुंदरच्या भेटीसाठी गेलेल्या भक्तांना सुंदरच्या निधनाची वृत्त समजताच धक्का बसला. कोल्हापूरमधील जोतिबा भक्त सुंदर हत्तीसाठी केळी, सफरचंद घेऊन खास सुंदर हत्तीला भेटण्यासाठी जात असत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आ…