no images were found
प्रतिभावान अभिनेत्री गौरी टोंक ‘इत्ती सी खुशी’ या आगामी मालिकेत एका हळव्या पण सहानुभूतीपूर्ण स्वभावाच्या नंदिता मेहताच्या भूमिकेत दिसणार
एक चांगले कथानक, हृदयस्पर्शी प्रोमो आणि मोठमोठ्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे सोनी सबवरील आगामी मालिका ‘इत्ती सी खुशी’च्या आगमनाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. मालिकेच्या गुणी कलाकारांच्या संचात आता गौरी टोंक या कसलेल्या अभिनेत्रीची भर पडली आहे. उत्तम अभिनय आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्सबद्दल ओळखली जाणारी गौरी या मालिकेत नंदिनी मेहता ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. ही एक महत्त्वाची भूमिका आहे, जिचा प्रभाव सुहास (वरुण बडोला) आणि अन्विता (सुम्बुल तौकीर खान) यांच्या जीवनावर पडतो.
अचूकतेचा ध्यास असलेल्या नंदिताच्या मनात एक खोलवर रुजलेली भीती आणि न सुटलेला भावनिक गुंता आहे. विनम्र आणि अलिप्त जीवन जगणाऱ्या नंदिताची व्यक्तिरेखा एक मार्मिक तथ्य ध्यानात आणून देते की, मनात चाललेले संघर्ष कसे बंद दरवाजांच्या मागे लपून राहतात.
या मालिकेत सहभागी होण्याबद्दल आणि आपल्या व्यक्तिरेखेविषयी गौरी टोंक म्हणते, “मी जेव्हा पहिल्यांदा ‘इत्ती सी खुशी’ ची कथा ऐकली, तेव्हा त्यातील साधेपणा आणि भावनिक गहिरेपण मला भावले. त्यात भडकपणा नाही. कथानक नाजुक, प्रामाणिक आणि भावनिक आहे. मी साकारत असलेली नंदिता वरकरणी शांत दिसते, पण आपल्या आंतरिक विश्वात ती सतत अस्वस्थ असते, सतत विचार आणि चिंता करत असते. तिच्या मनात अनेक वर्षांपासून एक भावनिक तणाव आहे, तिच्या मनातील भीतीचे कारणही तेच आहे. ती स्वतःचा तणाव कसा हाताळते हे आपल्याला मालिकेत बघायला मिळेल.”
मुंबईतील मध्यमवर्गीय वस्तीच्या पार्श्वभूमीवरील ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका एका अडचणीत असलेल्या कुटुंबातील रोखठोक, अस्ताव्यस्त आणि कधीकधी हलक्या-फुलक्या क्षणांचे वास्तव टिपते.