Home मनोरंजन मैत्रीची ध्येये! सोनी सबचे कलाकार साजरा करत आहेत फ्रेंडशिप डे- प्रेम, आनंद आणि पडद्यामागील हृदयस्पर्शी नात्यासह!

मैत्रीची ध्येये! सोनी सबचे कलाकार साजरा करत आहेत फ्रेंडशिप डे- प्रेम, आनंद आणि पडद्यामागील हृदयस्पर्शी नात्यासह!

9 second read
0
0
119

no images were found

मैत्रीची ध्येये! सोनी सबचे कलाकार साजरा करत आहेत फ्रेंडशिप डे- प्रेम, आनंद आणि पडद्यामागील हृदयस्पर्शी नात्यासह!

 शूटिंग संपल्यानंतर देखील तुमच्या सोबत राहते, ती सेटवर झालेली मैत्री, एकत्र बसून घेतलेला चहा, परस्परांतील आश्वासक शांतता, हास्य –विनोद आणि कठीण काळात दिलेला मूक आधार. या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने सोनी सबचे कलाकार अभिषेक वर्मा, आन तिवारी, शीहान कपाही आणि नवीन पंडिता आपल्या पडद्यामागच्या त्या सुंदर नात्यांविषयी सांगत आहेत, ज्याच्यामुळे सेट त्यांच्यासाठी दुसरे घर बनला.

‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत शौर्य सिन्हाची भूमिका करत असलेला अभिषेक वर्मा म्हणतो, “कुणी तरी तुमच्या पाठीशी आहे, या भावनेमुळे बळ मिळते. ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेच्या सेटवर मला अशी मैत्री गवसली आहे, ज्याचे मूळ समजूतदारपणा आणि मूक आधारात आहे. शब्बीर भाईसोबत माझे खूप खास नाते आहे. मी बऱ्याच वर्षांपासून त्याला ओळखतो. तो फक्त एक उत्कृष्ट अभिनेता नाही, तर खूप साधा माणूस आहे. आम्ही अभिनय कलेपासून ते जीवनापर्यंत अनेक गोष्टींवर एकमेकांशी खूप बोललो आहोत. त्याच्याकडून नेहमीच काही तरी शिकण्यासारखे असते. सेटवर, तो आसपास असला की एक आश्वासन वाटते. कधीकधी तर आम्हाला बोलण्याचीही गरज वाटत नाही. एखादे छान दृश्य केल्यानंतर केवळ एक दृष्टिक्षेप किंवा पाठीवर दिलेली थाप सारं काही सांगून जाते. अशी स्थिर, साधी आणि अस्सल मैत्री माझ्यासाठी फार मौल्यवान आहे.”

 वीर हनुमान’ मालिकेत हनुमानाची भूमिका करणारा बाल कलाकार आन तिवारी म्हणतो, “सेटवर असलेला प्रत्येक जण मला मित्रासारखा वाटतो. आम्ही एकत्र खेळतो, एकत्र जेवतो आणि कधीकधी मधल्या विश्रांतीत मस्ती देखील करतो. माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, तन्मय भैय्या, जो श्रीरामाची भूमिका करत आहे. हनुमान ज्याप्रमाणे नेहमी श्रीरामाची काळजी वाहत असतो, त्याचप्रमाणे, मला वाटते की, मैत्री म्हणजे सदैव एकमेकांच्या पाठीशी असणे. माझ्या सर्व मित्रांना फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा.”

 ‘वागले की दुनिया: नई पीढी नए किस्से’ मालिकेत अथर्व वागलेची भूमिका करणारा शीहान कपाही म्हणतो, “पडद्यावर आम्ही गंभीर दृश्ये चित्रित करत असलो, तरी पडद्याच्या मागे मात्र दोन टेक्सच्या मधल्या विश्रांतीत आम्ही खूप वेडेपणा करत असतो, एकमेकांच्या खोड्या काढत असतो. खास करून सुमित सर मला खूप चिडवतात. या कुटुंबाची सगळ्यात छान गोष्ट ही आहे की, येथे मला खरीखुरी मैत्री मिळाली आहे आणि आम्ही सगळे जणू एकाच कुटुंबाचा एक भाग आहोत. त्या सगळ्या वेड्या, मजेदार लोकांना फ्रेंडशिप डे च्या शुभेच्छा, ज्यांच्यामुळे शूटिंगचा प्रत्येक दिवस शाळेतल्या रिसेससारखा वाटतो!”

 पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत अश्विनची भूमिका करणारा नवीन पंडिता म्हणतो, “मला शूटिंगचा एक दिवस आठवतो आहे, ज्या दिवशी सगळं चुकतच होतं. आमचं शेड्यूल वेळेच्या मागे चाललं होतं. आयत्या वेळी दृश्यांमध्ये बदल होत होते आणि प्रत्येक जण थकला-भागला होता. पण, या सगळ्या गोंधळात, देशनाने एक गंमतीशीर कोटी केली, दर्शन कोणाची तरी हुबेहूब नक्कल केली आणि अचानक आम्ही सगळे लहान मुलासारखे हसू लागलो. सेटवरील मैत्री ही अशी असते. त्या मैत्रीच्या छायेत तुम्हाला आश्वस्त वाटते. पडद्यावर आम्ही वेगवेगळी पात्रे बजावत असतो, पण पडद्याच्या मागे मात्र आम्ही एक एकत्र टीम बनलो आहोत. ‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेची ती जादू आहे. या मालिकेने मला आयुष्यभराचे मित्र दिले.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक

कोल्हापुरातील तरुणाईच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार होणार- आमदार अमल महाडिक कोल्हापूर : …