Home आरोग्य १८ वर्षीय सुतारकाम करणार्‍या रुग्णाने अपघाताने गिळला खिळा

१८ वर्षीय सुतारकाम करणार्‍या रुग्णाने अपघाताने गिळला खिळा

12 second read
0
0
28

no images were found

१८ वर्षीय सुतारकाम करणार्‍या रुग्णाने अपघाताने गिळला खिळा 

नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगामध्ये पुण्यात सुतारकाम करणार्‍या १८ वर्षीय रुगाने काम करत असतांना चुकून एक खिळा गिळला.  त्याला बाणेरच्या मणिपाल हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले, त्याच्या पोटात खूप दुखत होते, म्हणून तत्काळ त्याचा एक्स रे काढण्यात आला.  एक्स रे तून असे आढळून आले की त्याच्या आतड्याच्या वरच्या भागात एक अचकुचीदार खिळा अडकला आहे.  अशा अणकुचीदार पदार्थांमुळे अंतर्गत जखमा होण्याची अधिक शक्यता असते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन डॉ. प्रसाद भाटे यांच्या टिमने वेगाने काम करत हा खिळा काढण्यासाठी एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला.

खिळा गिळल्यानंतर दोन तासांनी रुग्णाला रुग्णालयात आणण्यात आले होते.  एन्डोस्कॉपी केल्यामुळे शरीरातील कोणतीही बाह्य वस्तू शोधणे शक्य होते.  कारण रुग्णाने काहीही खाल्लेले नव्हते.  हा खिळा रुग्णाच्या छोट्या आतड्याच्या सुरुवातीला अडकलेला हातो, परिणामी तो काढणे खूपच कठीण काम होते कारण त्यामुळे काही अन्य महत्त्वाच्या अवयवांना त्रास होऊ शकत होता.  हा खिळा कोणतीही शस्त्रक्रिया न करता अगदी सहजपणे काढण्यात यश प्राप्त झाले.

या केस विषयी माहिती देतांना मणिपाल हॉस्पिटल बाणेर च्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीचे एचओडी आणि सिनियर कन्सल्टंट डॉ. प्रसाद भाटे यांनी सांगितले “ शरीरात दुसरी वस्तू शिरल्यामुळे विशेषकरुन अणकुचीदार वस्तूंमुळे शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव, परफोरेशन आणि संसर्ग होणे यासारख्या मोठ्या धोक्यांची शक्यता असते.  या केस मध्ये रुग्णाने अणकुचीदार ‍ खिळा गिळला होता, तो जर काढून टाकला नसता तर तो जीवघेणा ठरला असता.  अत्याधुनिक एन्डोस्कोपिक पध्दतीचा अवलंब केल्यामुळे आम्ही तो कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय काढू शकलो. यामुळे बरा होण्याचा वेळ वाचला आणि काही जटील अशा समस्यांपासूनही बचाव झाला.”

पुण्यातील बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल चे क्लस्टर डायरेक्टर श्री. आनंद मोटे यांनी सांगितले “ अशा घटनांमुळे वेळेत केलेला हस्तक्षेप आणि कुशल काळजी अधोरेखित होते, बाणेरच्या मणिपाल हॉस्पिटल मध्ये आम्ही पुणे आणि आसपासच्या भागातील लोकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यास वचनबध्द आहोत. कोणतीही शस्त्रक्रिया न करता अणकुचिदार वस्तू काढणे म्हणजे जटील गोष्टी सुरक्षितपणे आणि कार्यक्षमतेने काढणे अधोरेखित होते.  आरोग्य क्षेत्रातील नाविन्य आणि गुणवत्ता यामुळे आम्ही नेहमीच रुग्णांची सुरक्षा आणि उपचारांचे परिणाम यांत सुधारणा करत असतो.”

रुग्णाला खिळा काढल्यानंतर काही काळासाठी रुग्णालयात ठेवण्यात आले आणि त्यानंतर त्याच दिवशी कोणतही समस्या निर्माण न झाल्याने घरी पाठवण्यात आले.  कोणत्याही प्रकारे अंतर्गत दुखापत झालेली नाही ना हे पाहण्यासाठी पुन्हा एक्स रे काढण्यात आला व त्यातून असे दिसून आले की रुग्णामध्ये कोणतीही अंतर्गत समस्या निर्माण झालेली नाही.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…