no images were found
भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर अरुणाचलमध्ये कोसळले
सियांगः भारतीय सैन्याचे ध्रुव हेलिकॉप्टर अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात अत्यंत दुर्गम ठिकाणी कोसळले आहे. शोध व बचावकार्यासाठी पथकं रवाना झाली आहेत. दरम्यान, हेलिकॉप्टरमध्ये किती जण होते याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाहीये.
सियांग जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. सियांगपासून जवळपास २५ किलोमीटर दूर हा अपघात घडला आहे. सिंगिंग गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे.. चिंतेची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात घडला आहे ते अत्यंत दुर्गम ठिकाण आहे. त्यामुळं बचावकार्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तूतिंग मुख्यालयापासून काही अंतरावरच हे ठिकाण आहे.
येथील एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्यात डोंगराजवळ धुरांचे मोठे लोट दिसत आहेत.
दरम्यान, याआधी पाच ऑक्टोबर रोजी अरुणाचल प्रदेश जवळील तवांग परिसरात भारतीय वायुसेनेचे चीता हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात एका वैमानिकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर, एक एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.