Home मनोरंजन “प्रेम प्रथा धुमशान ” ४ नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित

“प्रेम प्रथा धुमशान ” ४ नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित

0 second read
0
0
191

no images were found

“प्रेम प्रथा धुमशान ” ४ नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित

कोल्हापूर : सिंधुदुर्गातली गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पावर येत आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित “प्रेम प्रथा धुमशान” या चित्रपटातून गावपळणीची प्रथा पहिल्यांदाच दिसणार असून, ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार आहे.
ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजीत वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजीत मोहन वारंग यांच्या पिकासो या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. स्थानंतर एकच अभिनेता असलेला जावू हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते प्रेम प्रथा धुमशान हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. महाराष्ट्राची हास्यजया फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खड़पकर अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालक, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत. चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात मशान घाला रे हे मालवणी गाणं सध्या सगळीकडे वाजत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयात गावपळण ही अनोखी प्रथा पाळली जाते. गावपळण प्रथा पाळणाऱ्या गावातील ग्रामस्थ एका ठरावीक काळासाठी गाव सोडून दुसरीकडे राहायला जातात. या पयेबाबत अनेक वदता आहेत. मात्र आजही ही प्रथा पाळली जाते. या प्रथेबरोबरच एक प्रेमकथा गुंफून प्रेमप्रथा धुमशान हा चित्रपट तयार झाला आहे. मात्र या प्रेमकथेला विरोधाची किनार आहे. या प्रेमकथेत संघर्ष, विरोध आहे, श्रद्धा-अंधश्रद्धेचा झगडा असं सार काही असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळत. गावपळण या प्रथेविषयीच मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रथेची पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा हा बोनस ठरणार आहे. त्यामुळेच अस्सल मालवणी भाषेतला, लोकसंस्कृतीवर आधारित “प्रेम प्रथा घुमशान” नक्कीच बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमशान घालणार यात शंका नाही.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…