no images were found
शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या उन्नतीचा मार्ग :- आमदार राजेश क्षीरसागर.
कोल्हापूर (प्रतिनिधी): नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग संदर्भात विरोधकांकडून केवळ राजकारणासाठी विरोध केला जात असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवून त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, वास्तवात अनेक शेतकऱ्यांचे शक्तीपीठ महामार्गाला समर्थन असून आज बैठकीसाठी आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला मान्यता देऊन सातबारे देखील जमा केले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात शक्तिपीठ महामार्गा बाबत शेतकरी आणि अधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, ” बैठकीमध्ये विरोधकांकडून चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आलेल्या रस्त्याची रुंदी ३०० मीटर नसून केवळ शंभर ते 110 मीटर एवढीच असणार आहे, त्याचबरोबर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकऱ्यांची वाहन आणि बैलगाड्या यांना येण्या जाण्यासाठी रस्ता असणार आहे. तसेच शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे योग्य किंमत दिली जाणार आहे, 2019 आणि 21 च्या पुराचा अनुभव घेऊन सध्या वाढवण्यात येणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची वाढणार आहे असे समजून संपूर्ण रस्त्यावर जिथे पूरबाधित क्षेत्र होते, तिथे भराव न टाकता, पिलर वर पूल बांधण्यात येतील. ब वर्ग जमिनी, देवस्थानच्या जमिनी, पतसंस्थांच्या जमिनी या जमिनीत कसणाऱ्याला कुठलंही नुकसान न होऊ देता त्याचं वर्गीकरण करून त्याला योग्य तो मोबदला दिला जाईल. एमआयडीसीच्या प्रत्येक झोन मध्ये ज्या प्रकारे कायदा आहे त्या प्रकारे त्यांना योग्य दर दिले जातील.
यासोबतच समृद्धी महामार्ग तयार झाल्यानंतर कमीत कमी वेळामध्ये एका गावाहून दुसऱ्या गावाला शेतकऱ्याचा भाजीपाला पोचू लागला, त्यामुळे शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला किंमत आली, अनेक ठिकाणी इंडस्ट्रीज निर्माण झाल्या, प्रवासाचा वेळ कमी झाला असे अनेक फायदे झाले आहेत.
त्याचबरोबर महाराष्ट्र एवढेच क्षेत्रफळ असणाऱ्या प्रगत रस्त्यांमुळे त्या देशांची जोरदार प्रगती झाली आहे, असे सांगून शक्तीपीठ महामार्ग होणे ही काळाची गरज असून, विरोधकांनी विरोधाचे राजकारण बंद करावे, आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवणे बंद करावे असे आवाहन केले..
आजच्या बैठकीसाठी 60 गावातील प्रमुख लोकांनी उपस्थिती लावून शक्तीपीठ महामार्गाला लोकांचा विरोध नसून राजकारणाला दबून नागरिक पुढे येत नाही आहेत, तुम्ही मोजदाद सुरू करा, नागरिकांनी शेतकरी स्वतःहून तुम्हाला समर्थन देतील, असे सांगून अनेकांनी सातबारा उतारा या बैठकीत दिला.
बैठकीला एम एस आर डी सी चे एम.डी ए बी गायकवाड, शिवसेनेचे महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ महामार्ग समर्थक समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव, बापू शिंगाडे, रुचीला बाणदार, नवनाथ पाटील, योगेश पाटील, रामचंद्र अकोलकर, बाबुराव खापरे,सूर्यकांत चव्हाण, विजय हवालदार, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते…