
no images were found
काँग्रेस नेत्याचे भारत जोडो यात्रेदरम्यान निधन
महाराष्ट्रात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पोहोचली आहे. या भारत जोडो यात्रा काळात काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस असलेल्या एका काँग्रेस नेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नांदेड मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान ते झेंडा समुहाचे संचलन करत असताना त्याचवेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या तीव्र झटक्यामुळे पांडे यांचे निधन झाले.