Home उद्योग फूड सेफ्टी अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन गोवा, नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया आणि नेस्ले इंडियाद्वारे गोव्यामध्ये ‘सर्व्ह सेफ फूड’ प्रकल्पाचा विस्तार

फूड सेफ्टी अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन गोवा, नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया आणि नेस्ले इंडियाद्वारे गोव्यामध्ये ‘सर्व्ह सेफ फूड’ प्रकल्पाचा विस्तार

2 second read
0
0
31

no images were found

फूड सेफ्टी अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन गोवा, नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया आणि नेस्ले इंडियाद्वारे गोव्यामध्ये ‘सर्व्ह सेफ फूड’ प्रकल्पाचा विस्तार

१,००० हून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्यांना अन्न सुरक्षितता अधिक वाढविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार

गोव्यामध्ये ‘सर्व्ह सेफ फूड’ प्रकल्पाच्या भौगोलिक सीमा रुंदावत नेस्ले इंडियाने उत्तर व दक्षिण गोव्यातील १,००० हून अधिक स्ट्रीट फूड विक्रेत्या फेरीवाल्यांना प्रशिक्षित करण्यासाठी एफडीए, गोवा आणि नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (एनएएसव्‍हीआय) यांच्यासोबत सहयोग सुरू ठेवला आहे, ज्यामुळे या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या राज्यातील एकूण स्ट्रीट फूड व्हेंडर्सची संख्या ४,००० च्या वर गेली आहे.

‘सर्व्ह सेफ फूड’ प्रकल्पामुळे याआधीच २६ राज्यांतील व ४ केंद्रशासित प्रदेशांतील ९२,८०० स्ट्रीट फूड व्हेंडर्सना आरोग्य, स्वच्छता, अन्नाची सुरक्षितपणे हाताळणी, कचऱ्याची विल्हेवाट आणि उद्योजकता यांविषयीचे शिक्षण देऊन त्यांचा फायदा करून दिला आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम फेरीवाल्यांना त्यांच्या अन्न हाताळण्याच्या पद्धती सुधारण्याचे ज्ञान देऊन त्यांना सक्षम बनवतो.

गोवा सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संचालक श्रीम. श्वेता एस. देसाई म्हणाल्या, “गोव्यामध्ये फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची प्रचंड वर्दळ असते. आमचे स्ट्रीट फूड हा आमच्या संस्कृतीचा एक मोठा हिस्सा आहे आणि तो कोणत्याही पर्यटकांच्या कार्यक्रमपत्रिकेतल्या काही सर्वात प्रमुख घटकांपैकी एक आहे, याची आम्हाला कल्पना आहे. आमच्या स्ट्रीट फूड व्हेंडर्सना अन्नाची स्वच्छता व सुरक्षितता जपण्याच्या कामी अधिक कुशल बनवित त्यांना सक्षम बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे. ‘सर्व्ह सेफ फूड’ प्रकल्पाच्या माध्यमातून हे उद्दीष्ट साध्य करण्यामध्ये आमची मदत केल्याबद्दल मी नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट व्हेंडर्स ऑफ इंडिया (एनएएसव्‍हीआय), एफडीए आणि नेस्ले इंडिया यांच्यातील सहयोगाची आभारी आहे.”

नेस्ले इंडियाच्या सस्टेनॅबिलिटी अँड सोसायटल इनिशिएटिव्ह विभागाच्या प्रमुख श्रीम. तरुणा सक्सेना म्हणाल्या, “नेस्ले इंडियामध्ये आम्ही खुद्द आमच्या उत्पादनांच्या दर्जा व सुरक्षिततेपलिकडे जात भारतातील अन्न सुरक्षेच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो. प्रोजेक्ट सर्व्ह सेफ फूड स्ट्रीट फूड व्हेंडर्सना स्वच्छता आणि अन्न सुरक्षेविषयीच्या कार्यपद्धतींशी संबंधित प्रशिक्षण देत त्यांच्या कौशल्याची श्रेणी वाढवून त्यांना सक्षम बनवितो. यामुळे अन्न सुरक्षा आणि स्वच्छता या व तत्संबंधी विषयांबद्दल त्यांच्या जागरुकतेत वाढ होते. आम्ही या प्रकल्पाची व्याप्ती वाढवित आहोत आणि यामुळे हळूहळू या व्यवसायातील लोकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडून येतील व त्यांच्या व्यवसायाची एकूण वाढ व शाश्वतता यांमध्ये या प्रकल्पाचे योगदान असेल, अशी आम्हाला खात्री आहे.”

नेस्ले इंडियाने २०१६ साली प्रोजेक्ट सर्व्ह सेफ फूडची सुरुवात केली व त्याअंतर्गत आसाम, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओडिशा, पुडुच्चेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांतील स्ट्रीट फूड व्हेंडर्सना प्रशिक्षण दिले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…