Home उद्योग अदानीने भारतातील पहिला 5 मेगावॉट क्षमतेचा ऑफ-ग्रिड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट सुरू केला

अदानीने भारतातील पहिला 5 मेगावॉट क्षमतेचा ऑफ-ग्रिड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट सुरू केला

16 second read
0
0
41

no images were found

अदानीने भारतातील पहिला 5 मेगावॉट क्षमतेचा ऑफ-ग्रिड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट सुरू केला

·         भारताच्या नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा

·         ऑफ-ग्रिड, नवीकरणीय ऊर्जेवर चालणाऱ्या ग्रीन हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्ह्जच्या औद्योगिक वापराची तांत्रिक शाश्वतता सिद्ध करताना उत्सर्जन-प्रधान क्षेत्रांसाठी नवा मार्गदर्शक ठरतो

अहमदाबाद,:अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड (एएनआयएल) ने आज गुजरातमधील कच्छ येथे भारतातील पहिला ऑफ-ग्रिड 5 मेगावॉट क्षमतेचा ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट यशस्वीरित्या कार्यान्वित केल्याची घोषणा केली. हा प्रकल्प देशाच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.

हा अत्याधुनिक प्लांट 100% सौर ऊर्जेवर आधारित असून बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) सोबत एकत्रित केले गेले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णपणे ऑफ-ग्रिड कार्यरत होऊ शकतो. हे विकेंद्रीकृत, नवीकरणीय ऊर्जेवर आधारित हायड्रोजन निर्मितीच्या नव्या युगाची सुरुवात आहे.

एएनआयएल चा हा पायलट प्लांट भारतातील पहिलाच ऑफ-ग्रिड 5 मेगावॉट ग्रीन हायड्रोजन प्रकल्प आहे, ज्यामध्ये पूर्णपणे स्वयंचलित, क्लोज्ड-लूप इलेक्ट्रोलायझर प्रणाली बसवण्यात आली आहे. ही प्रणाली प्रत्यक्ष सौर ऊर्जा पुरवठ्याच्या बदलत्या स्वरूपानुसार गतिशीलपणे प्रतिसाद देण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यामुळे सौर ऊर्जेतील चढ-उतार सांभाळण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्यक्षम लवचिकता मिळते, तसेच कार्यक्षमतेसह सुरक्षितता आणि कामगिरीही सुनिश्चित केली जाते.

या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे अदानी ग्रुपची नवप्रवर्तन, शाश्वतता आणि उदयोन्मुख ग्रीन हायड्रोजन अर्थव्यवस्थेतील नेतृत्वाची बांधिलकी अधोरेखित होते. यामुळे भारताला ग्रीन हायड्रोजन उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने चाललेल्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि उत्सर्जन-प्रधान उद्योगांमध्ये नवीकरणीय ऊर्जेवर आधारित औद्योगिक वापरासाठी नवा आदर्श निर्माण होईल.

हा पायलट प्लांट एएनआयएल च्या मुंद्रा, गुजरात येथील आगामी ग्रीन हायड्रोजन हबसाठी एक प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट म्हणूनही कार्य करेल. हा हब भारताच्या कमी-कार्बन भविष्यामध्ये मोठे योगदान देणार आहे. ग्रीन हायड्रोजन खतनिर्मिती, रिफायनिंग आणि जड वाहतूक यांसारख्या क्षेत्रांचे डिकार्बोनायझेशन करण्यात आणि जागतिक नेट-झिरो उद्दिष्ट साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

हा उपक्रम भारत सरकारच्या ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ (एनजीएचएम) शी सुसंगत आहे, ज्याचा उद्देश आयात अवलंबन कमी करणे, ऊर्जा स्वावलंबन वाढवणे आणि ऊर्जा-प्रधान उद्योगांचे डिकार्बोनायझेशन वेगाने घडवून आणणे असा आहे आणि हे सर्व भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाच्या पूर्ततेसाठी आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण

डिजिटल अध्यापनासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण        &n…