no images were found
बारावीचा पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीने ओढणीने गळफास लाऊन केली आत्महत्या
कोल्हापूर : कोल्हापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या बारावीच्या परिक्षा सुरू आहेत. यामध्ये पेपर अवघड गेल्याने विद्यार्थिनीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना दुपारी उघडकीस आली. लिया रुकडीकर अस या मुलीच नाव आहे. ही घटना करवीर तालुक्यातील मोरेवाडी इथल्या समर्पण कोरे नगरात घडली.
लिया ही मंगळवार पेठेतील एका ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. सध्या बारावीची परीक्षा सुरू आहेत. लिया ही सायन्स मधून बारावीच शिक्षण घेत होती. सोमवारी झालेला पेपर अवघड गेल्याने लिया रुकडीकर ही तणावात असल्याचं तिच्या कुटुंबियांच्याही लक्षात आलं होतं. तिच्या वडिलांनी तिची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला होता. सकाळी तिची आई आणि वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. छोटा भाऊ देखील शाळेला गेला होता. घरी आजी आणि लिया असे दोघेजण होते. दुपारी वडिलांनी तिला फोन केला होता तेव्हा तिने आपल्याला बरं वाटत नसल्याचं सांगितलं होतं. दरम्यान दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लियाचे वडील अमित रुकडीकर हे घरी आले. त्यांनी लियाला साद घातली. पण तिच्या खोलीतून प्रतिसाद आला नाही. म्हणून त्यांनी खिडकीतून पाहिल. त्यांना संशय आल्यान त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतलं आणि दरवाजा तोडण्यास सांगितलं.
त्यावेळी लियान सिलिंग फॅनला ओढणीन गळफास घेतल्याच आढळून आलं. या सर्वांनी तिला खाली उतरून तात्काळ सीपीआरमध्ये दाखल केलं. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याच वैद्यकीय अधिकाऱ्यानी सांगितलं.याप्रकरणी करवीर पोलीसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लिया हिचे वडील शिवणकाम करतात. आई शिक्षिका आहे. अभ्यासात हुशार असलेल्या मुलीने अनपेक्षितपणे आत्महत्या केल्यामुळे आई-वडिलांना धक्का बसला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.