Home क्राईम अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मुकेश अंबानी यांचा बंगल्यावर बॉम्ब स्फोट होणार; नागपूर पोलिसांना धमकीचा फोन

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मुकेश अंबानी यांचा बंगल्यावर बॉम्ब स्फोट होणार; नागपूर पोलिसांना धमकीचा फोन

0 second read
0
0
109

no images were found

अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, मुकेश अंबानी यांचा बंगल्यावर बॉम्ब स्फोट होणार; नागपूर पोलिसांना धमकीचा फोन

नागपूर : नागपूर पोलीस कंट्रोलला एक फोन आला आणि सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने थेट मुंबईतील प्रसिद्ध लोकांची घरेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या फोन नंतर नागपूर पोलीस अलर्ट झाले असून फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांचा अँटालिया बंगला उडवून देण्याची धमकी दिली आहे. तसेच अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांचे बंगलेही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा फोन आल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली . ही माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून फोन करणाऱ्याचा शोध घेत आहे.
एका अज्ञात व्यक्तीने नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन केला. पोलिसांच्या 112 क्रमांकावर पालघरमधून हा फोन आल्याचं सांगितलं जात आहे. दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या बॉम्ब निरोधक पथकाने तात्काळ तिन्ही ठिकाणी जाऊन तपासणी केली. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी 25 सशस्त्र लोक मुंबईतील दादरला पोहोचणार आहेत, अशी धमकीही निनावी फोन करणाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली आहे. हे लोक कधी मुंबईत पोहोचणार आहेत. ते कुठे कुठे हल्ले करणार आहेत. याची काहीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस तारांबळ उडाली असून पोलिसांनी फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप   मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल…