no images were found
३५०० हून अधिक लीड-पॉवर्ड शाळांमधील १.४ दशलक्षांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी मास्टरक्लास
मुंबई: भारतातील लहान शहरांमधील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यावर, तसेच त्यांना उपलब्ध होऊ न शकणाऱ्या संधी देण्यावर लक्ष केंद्रित करत भारतातील आघाडीची स्कूल एडटेक कंपनी लीडने आज ऑलिम्पिक पदक विजेते व दिग्गज टेनिसपट्टू लिएंडर पेस यांच्यासोबत नेतृत्व व सहयोग या विषयावरील विशेष मास्टरक्लासची घोषणा केली. भारतातील ४००हून अधिक नगर व शहरांमधील लीड-पॉवर्ड शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी लिएंडर शिक्षक व मार्गदर्शक बनले. त्यांनी त्यांच्या स्वत:च्या जीवनात व कारकिर्दीत शिकलेल्या गोष्टी सांगण्यासोबत टेनिस खेळाच्या इतिहासामध्ये सर्वात यशस्वी डबल्स प्लेअर्सपैकी एक म्हणून स्वत:चे नावलौकिक करण्यामध्ये फायदेशीर ठरलेले दोन महत्त्वाचे पैलू यशस्वी नेतृत्व व सहयोगाबाबतचे सिक्रेट्स देखील सांगितले.
लीडच्या विद्यार्थ्यांसोबतच्या सहयोगाबाबत बोलताना लिएंडर पेस म्हणाले, ‘’मला लीडच्या मास्टरक्लासचा भाग होताना आनंद होत आहे. नेतृत्व म्हणजे सहानुभूमी, करिष्मा, संवाद व समस्या निवारणाचे योग्य संयोजन. आजच्या युगात शाळांनी विद्यार्थ्यांना वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच नेतृत्व, सहयोग व संप्रेषण यांसारख्या २१व्या शतकातील आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले पाहिजे. ज्यामुळे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशासाठी भक्कम पाया रचला जाईल.’’
लीडची मास्टरक्लास सिरीज लहान नगरांमधील शालेय विद्यार्थ्यांना विषय तज्ञ व सेलिब्रिटींकडून प्रत्यक्ष शिकण्याची संधी देत सर्वांगीण अध्ययन अनुभव देण्यासाठी भारतातील पहिला उपक्रम आहे. वैयक्तिक कौशल्य व कल यावर आधारित लीडची मास्टरक्लास सिरीज विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न पाहण्यास प्रोत्साहित करते आणि त्यांच्यामध्ये जीवनातील त्यांची ध्येये संपादित करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करते. लीड मास्टरक्लासचे धडे यापूर्वी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, टेनिस चॅम्पियन सानिया मिर्झा आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांसारख्या सेलिब्रिटींनी घेतले आहेत. लीडचा सध्याचा मास्टरक्लास अभिनेता-दिग्दर्शक आर. माधवन यांच्या नेतृत्वांतर्गत मागील पर्वाचे अनुसरण करतो. या मास्टरक्लासने व्यक्तिमत्त्व विकास व विकसित मानसिकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि अत्यंत यशस्वी ठरले.