Home शासकीय PM मोदींच्या वाढदिवशी भारताला मिळणार ८ चित्ते

PM मोदींच्या वाढदिवशी भारताला मिळणार ८ चित्ते

2 second read
0
0
117

no images were found

PM मोदींच्या वाढदिवशी भारताला मिळणार ८ चित्ते

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून, हा दिवस यंदा खास असणार आहे. या दिवशी देशातून नामशेष झालेला चित्ता भारतात परतणार आहे. 70 वर्षांनंतर भारतात चित्ते धावणार आहे, यासाठी नामिबियाला भारताचे विशेष विमान गेले आहे. या विमानाद्वारे नामिबियातून 8 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. पीएम नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवशी हे चित्ते देशाला सुपूर्द करतील.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांना सोडले जाणार आहे.या चित्त्यांना घेण्यासाठी नामिबियात पोहोचलेल्या विशेष विमानाला सुंदर अशा चित्त्याच्या रंगात रंगवण्यात आले आहे. या विशेष विमानाद्वारे नामिबियातून चित्ते आधी जयपूरला आणि तेथून हेलिकॉप्टरद्वारे मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात आणले जातील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …