Home संशोधन तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेस उद्या प्रारंभ

तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेस उद्या प्रारंभ

3 second read
0
0
7

no images were found

 

तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेस उद्या प्रारंभ

कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठात उद्यापासून (दि. १९) सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेच्या निमित्ताने देशभरातील विद्वान संख्याशास्त्रज्ञांसह निवडक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संख्याशास्त्रज्ञांची मांदियाळी विद्यापीठाच्या प्रांगणात जमणार आहे. विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. शशीभूषण महाडिक यांनी ही माहिती दिली.

शिवाजी विद्यापीठात उद्यापासून ‘अॅडव्हान्सेस इन स्टॅटिस्टिकल मेथड्स, डेटा सायन्स अँड ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स’ या विषयावरील तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. परिषदेमध्ये विशेष परिसंवादांसह निमंत्रितांची मार्गदर्शन सत्रे आणि अभ्यासक, संशोधकांची सहभाग सत्रेही होणार आहेत. या निमित्ताने संख्याशास्त्राच्या क्षेत्रातील जागतिक प्रवाहांची वेधक आणि वेचक चर्चा परिषदेत होणार आहे. त्यासाठी भारताच्या विविध शैक्षणिक संस्थांसह शासन तसेच खासगी क्षेत्रात कार्यरत असणारे आघाडीचे संख्याशास्त्रज्ञ, संशोधक आणि अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. त्याखेरीज आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्रज्ञही येणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ प्रा. दिगंबर शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या परिषदेत प्रारंभी ज्येष्ठ समाजसेवक, विचारवंत डॉ. अभय बंग हे ‘लोकांसमवेत संशोधन’ या वेगळ्या विषयावर बीजभाषण करतील. या सत्राच्या अध्यक्षस्थानी पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे असतील. त्यानंतरच्या विशेष सत्रात डॉ. गोरे हे ‘जटायू फेल्स अगेन’ या विषयावर बोलतील. त्यांच्यासमवेत अमेरिकेच्या मिसिसिपी स्टेट विद्यापीठातील डॉ. प्रकाश पाटील हे ‘ऑन पॅरामेट्रिकली गायडेड नॉन-पॅरामेट्रिक एस्टीमेशन’ या विषयावर बोलतील. भारतातील ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ प्रा. आर.एन. रट्टीहळ्ळी या सत्राचे अध्यक्षस्थान भूषवतील.

या परिषदेमध्ये मलेशियामधील सेन्स मलेशिया पेनांग विद्यापीठातील प्रा. मायकेल बी.सी. खू, रिव्हरसाइड (अमेरिका) येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रा. आशिष सेनगुप्ता, ग्रीसमधील पायरेयस विद्यापीठातील प्रा.एथनासिओसिस सी. रॅकिझिस, अमेरिकेतीलच टेक्सास विद्यापीठातील संशोधक व कर्करोगतज्ज्ञ प्रा. संजय शेटे आणि सांता बार्बरा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रा. एस. राव जम्मालमकडा हे सहभागी होतील. त्यांच्याखेरीज भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सोनाली अडकी, मधुसूदन अडकी, केंद्रीय नॅशनल सँपल सर्व्हे कार्यालयाचे शिवाजी पाटील, जयप्रकाश होनराव, वेदांत कोंडकर, आयआयटी-मुंबईचे प्रा. ए. सुब्रमण्यम, प्रा. संजय सबनीस, बडोदा विद्यापीठाचे प्रा. के. मुरलीधरन, पार्कर एव्हरी उद्योगसमूहाचे दिनेश हेलवाडे, इन्स्टिट्यूट ऑफ सिस्टीम्सचे यशवंत महाकाल, आयआयटी-तिरुपतीचे प्रा. एन. बालकृष्णा, आयआयएससी बेंगलोरचे प्रा. शिरीष शेवडे, पुणे विद्यापीठाचे प्रा. माणिक आवळे, प्रा. यू.व्ही. नाईक-निंबाळकर, ‘आय एम स्टील अलाइव्ह’चे सयाजी हांडे, पुण्याच्या सिम्बायोसिस येथील शर्वरी शुक्ला, बजाज फिनसर्वचे शिवाजी डिसले, बेंगलोर विद्यापीठातील प्रा. एच. जे वामन, प्रा. परमेश्वर पंडित, पंजाबमधील प्लाक्ष विद्यापीठाचे प्रा. टी.व्ही. सामनाथन, जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा. किर्ती कमलजा, प्रा. रामकृष्ण शिंदे, कलबुर्गी येथील गुलबर्गा विद्यापीठाचे प्रा. बी.व्ही. धांद्रा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रा. विकास घुटे, धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठाच्या प्रा. सुरेखा मुनोळी, प्रा. शारदा भट, मुंबई विद्यापीठाच्या प्रा. वैजयंती दीक्षित, मैसूर विद्यापीठाचे प्रा. एस. रवी, पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठाचे प्रा. हेमंत कुलकर्णी, नवी मुंबईचे प्रा. ए.बी. जाधव, पुण्याच्या आबासाहेब गरवाडे महाविद्यालयाचे प्रा. के.एस. शेंडे, सांगोला महाविद्यालयाचे प्रा. ओ.डी. घोंगडे यांच्यासह शिवाजी विद्यापीठासह परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील संख्याशास्त्राचे शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थीही परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

व्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसाय विस्तारा मिथिलेश पांडे – सराफ संघाची कार्यशाळा उत्साहात

  व्यावसायिक संधींचा फायदा घेऊन व्यवसाय विस्तारा मिथिलेश पांडे – सराफ संघाची कार्यशाळ…