
no images were found
कृषिविपणनावरअर्थशास्त्र विभागात सोमवारपासून 36 वी राष्ट्रीय परिषद
कोल्हापूर : हैद्राबादयेथील द इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चरल मार्केटिंग आणि शिवाजीविद्यापीठाचा अर्थशास्त्र अधिविभाग (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमानेसोमवार, दि. 14 ते बुधवार, दि.16 नोव्हेंबर दरम्यान कृषि विपणन विषयावरील 36 व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या राजर्षिशाहू सभागृहात होणार्या या परिषदेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहितीराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक आणि अर्थतज्ज्ञ प्रा. डॉ. ज्ञानदेव तळुले यांनीदिली.
भारत सरकारचे केंद्रीय सचिव तथा नॅशनल रेनफेडएरिया प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अशोकदलवाई राष्ट्रीय परिषदेत बीजभाषण करणार आहेत. कृषिमूल्य आयोगाचे माजीअध्यक्ष तथा द इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चर मार्केटिंगचे अध्यक्ष प्रा.एस. महेंद्र देव राष्ट्रीय परिषदेची संकल्पना विषद करणार आहेत. नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक डॉ. सत्यसाई हे यावेळी ख्यातनाम अर्थतज्ज्ञ स्व. प्रो.जी. पार्थसारथी मेमोरिअल लेक्चर देणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या माजीडेप्युटी गव्हर्नर डॉ. उषा थोरात, जागतिक बँकेचे अर्थतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखररानडे यांच्यासह अनेक मान्यवर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. शिवाजीविद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखालीउद्घाटन समारंभ होणार आहेत. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. पी. एस. पाटीलउपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रा. तळुले यांनी दिली.
यापरिषदेत मुख्यतः कृषि विपणनात तंत्रज्ञानाची भूमिका, पशूधन आणि पशूधनउत्पादन विपणन आणि महाराष्ट्रातील कृषि विपणनात सरकारची भूमिका या तीनप्रमुख संकल्पनांवर मंथन होणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, ओरिसा, मेघालय, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, दिल्ली यासह अनेक राज्यांतून 60 हून अधिक संशोधन पेपर आले आहेत.अर्थशास्त्र, कृषि विपणन आणि कृषि अर्थशास्त्राशी संबंधित सर्वांनाच हीपरिषद एक मोठी पर्वणी असणार आहे, असे प्रा. तळुले यांनी नमूद केले.