no images were found
‘गाथा नवनाथांची‘ या मालिकेतील कलाकारांची सिद्धेश्वर मंदिर कवलापूरला भेट!
सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं असून नाथसंप्रदायाविषयी मिळणारी माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य प्रेक्षकांना पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. यापुढेही नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेत पाहायला मिळतील. रेवणनाथांचा नाथपंथाच्या दिशेकडील प्रवासही उत्तम सुरू आहे. अशातच मालिकेतील कलाकार जयेश शेवलकर आणि वासुदेव मदने यांनी सिद्धेश्वर मंदिर कवलापूर, सांगली येथे भेट दिली आहे. या देवस्थानी कलाकारांच्या उपस्थितीत किर्तनकार ह.भ.प अवधूत बाळकृष्ण मिरजकर महाराज यांनी मालिकेची कथा कीर्तन स्वरूपात रसिक प्रेक्षकांना ऐकवून तल्लीन केलं. ‘गाथा नवनाथांची’ मालिकेच्या पुढील भागांत नाथ संप्रदायाची परंपरा पाहायला मिळणार असून मालिकेत आता कोणते चमत्कार घडणार, अशुभ शक्तींचा नाश नाथ कसा करणार, हे पाहणे रंजक ठरेल.