no images were found
दिवाळीत मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार
मुंबई : यावर्षी दिवाळीत मंगळवार दि. २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी आली की चंद्रग्रहण होते. दीपावलीनिमित्त पृथ्वीवर दीपोत्सवाची रोषणाई केली जाईल आणि आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार आहे.
दिवाळीतील अश्विन अमावास्या मंगळवार दि २५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास ग्रस्तास्त सूर्यग्रहण होणार असून ते संपूर्ण भारतात दिसणार आहे. हे आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण यूरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसणार आहे. ग्रहण दिवसाच्या ज्या प्रहरात सुरू होते ते सोडून त्याआधीचे ४ प्रहर गृहीत धरावेत. २५ ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजून २५ मिनीटांनी या ग्रहणाचे वेध सुरू होत आहेत.ग्रहण काळात जे नियम पाळणार आहात ते पहाटेपासूनच पाळावेत असा याचा अर्थ होतो. वेधामध्ये जेवण आणि पाणी वर्ज्य केले जावे असे शास्त्रात सांगतात. ग्रहण दुपारी ४ वाजून २२ मिनीटांनी ग्रहण सुरू होते. ग्रहण सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत अनेक गोष्टी टाळण्यास सांगितले आहे.