Home क्राईम मंत्री संदिपान भुमरेंच्या मावसभावाचे अपघाती निधन

मंत्री संदिपान भुमरेंच्या मावसभावाचे अपघाती निधन

0 second read
0
0
184

no images were found

मंत्री संदिपान भुमरेंच्या मावसभावाचे अपघाती निधन

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या जवळच्या नातेवाईकाचे अपघाती निधन झाले. माजी सरपंच अंबादास नरवडे यांचा मुंबईहून औरंगाबादला येत असताना मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाला. या अपघातात नरवडे झाले, तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती प्राप्त होताच मंत्री भुमरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. नरवडे हे भुमरे यांच्या विश्वासातील खास समर्थक होते. ते भुमरेंचे मावस बंधू असल्याची माहिती आहे.

अंबादास नरवडे आणि इतर तीन कार्यकर्ते हे कामानिमित्त मुंबईला गेले होते. काम आटोपून मंगळवारी रात्री ते त्यांच्या कारने कार्यकर्त्यांसह औरंगाबदकडे निघाले होते. मुंबई – पुणे महामार्गांवर त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. कंटेनरला धडकून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातानंतर कारमधील चारही जखमींना तातडीने तळेगाव येथे हलविण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून नरवडे यांना मृत घोषित केले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Load More Related Articles

Check Also

कोल्हापूर डाक विभागामार्फत जिल्ह्यात 1 मे पासून “ज्ञान पोस्ट” सेवा सुरु

कोल्हापूर डाक विभागामार्फत जिल्ह्यात 1 मे पासून “ज्ञान पोस्ट” सेवा सुरु  …