
no images were found
जळगावमध्ये खडसे समर्थक 6 वर्षांसाठी निलंबित
सध्या राज्याच्या राजकारणात असंख्य घडामोडी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावमधून बसलेल्या धक्क्यामुळे त्यात भर पडली आहे. भुसावळ नगरपालिकेत एकनाथ खडसे यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई करण्यात आली असून येथील माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले आहे. नगरपालिकेचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक दिवस आधीच तत्कालीन भाजपच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याच समर्थकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भाजपचे तत्कालीन नगराध्यक्ष यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. या कारवाईमुळे खडसे तसेच राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे. कारवाईमध्ये माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले आहे.
निलंबित झालेल्या सदस्यांची नावे– 1) रमण देविदास भोळे, 2) अमोल इंगळे, 3) लक्ष्मी रमेश मकासरे, 4) प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे, 5) मेघा देवेंद्र वाणी, 6) बोधराज दगडू चौधरी, 7) शोभा अरुण नेमाडे, 8) किरण भागवत कोलते, 9) शैलजा पुरुषोत्तम नारखेडे, 10) पुष्पाताई रमेशलाल बतरा.