
no images were found
राजन साळवी आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार
मुंबई : ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी हे आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सोमवारी राज्यातील ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात मोठे यश प्राप्त झालेले आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर मतदारसंघात ठाकरे गटाने अनेक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला. हा विजय शिंदे गटास एक धक्का आहे. दरम्यान आज ठाकरे गटाचे उपनेते राजन साळवी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्या या भेटीत इतर मुद्द्यांवर चर्चा होऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.