
no images were found
सेलिओकडून गोव्यामध्ये पहिले स्टोअर लाँच, भारतातील आपली उपस्थिती वाढवली
पणजी- सेलिओ या प्रीमियम फ्रेंच मेन्सवेअर ब्रॅण्डने गोव्यामध्ये आपल्या पहिल्या स्टोअरच्या लाँचची घोषणा केली आहे. पणजी येथे स्थित हे विस्तृत २,००० चौरस फूट स्टोअर समकालीन फॅशन आणि पॅरिसियन आकर्षकतेला एकत्र आणत प्रांतामधील मेन्सवेअर रिटेलला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास सज्ज आहे. हे सेलिओचे भारतातील ६८वे स्टोअर आहे, ज्यामुळे देशभरातील त्यांची उपस्थिती अधिक दृढ झाली आहे.
नवीन स्टोअरमध्ये सेलिओचे सिग्नेचर कलेक्शन पाहायला मिळते, जे स्टायलिश कॅज्युअलवेअर, रिफाइन्ड फॉर्मल्स आणि आवश्यक अॅक्सेसरीजची व्यापक श्रेणी देते. तज्ञांनी बनवलेले शर्ट्स व वैविध्यपूर्ण चिनोजपासून ट्रेण्ड-फॉरवर्ड डेनिम्स व स्टेटमेंट जॅकेट्सपर्यंत प्रत्येक पीसमधून ब्रॅण्डची उच्च क्वॉलिटी, आरामदायीपणा आणि प्रभावी स्टाइलप्रती समर्पितता दिसून येते. या कलेक्शनमध्ये १०० टक्के लिनेन एन्सेम्बल्स, को-ऑर्ड सेट्स, लिनेन पॅण्ट्स, लूज-फिट जीन्स, प्रिंटेड शर्ट्स, पोलोज, टी-शर्ट्स आणि अद्वितीय अॅनिम-प्रेरित लाइनसह फॅन-फेव्हरेट्स जसे नरूटोचा समावेश आहे. आधुनिक काळातील पुरूषासाठी डिझाइन करण्यात आलेले हे स्टोअर कामापासून विश्रांतीपर्यंत आवश्यक वॉर्डरोबसाठी पसंतीचे गंतव्य बनण्यास सज्ज आहे.
पणजीमध्ये धोरणात्मकरित्या स्थित या स्टोअरच्या डिझाइनमध्ये ग्राहक सहभागासह स्लीक, समकालीन लेआऊटला प्राधान्य देण्यात आले आहे. समर्पित उत्पादन विभाग, उत्साहवर्धक शॉपिंग वातावरण आणि एकसंध नेव्हिगेशन असलेले हे स्टोअर डायनॅमिक व सर्वोत्तम रिटेल अनुभव देण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन करण्यात आले आहे, जे सेलिओच्या जागतिक फॅशन तत्त्वांचे प्रतीक आहे.
या उल्लेखनीय विस्तारीकरणाबाबत आपले मत व्यक्त करत सेलिओ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्येन मोमया म्हणाले, ”आम्हाला उत्साही गोव्या राज्यामध्ये सेलिओचा पॅरिसियन फॅशन वारसा आणण्याचा आनंद होत आहे. हे शहर प्रभावी स्टाइल आणि सर्वोत्तम अत्याधुनिकतेचे प्रतीक असण्यासह पणजी आमच्या स्टोअरसाठी परिपूर्ण लोकेशन आहे. हे लाँच भारतातील आमची उपस्थिती वाढवण्याप्रती आणि सूक्ष्मदर्शी ग्राहकांना फॅशन-फॉरवर्ड, उच्च दर्जाचे व सहज उपलब्धता देत मेन्सवेअर देण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करते. आम्ही गोव्यामधील खरेदीदारांचे उत्साही रिटेल अनुभव घेण्यास स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय ट्रेण्ड्स आणि दैनंदिन वेअरेबिलिटीचे संयोजन आहे.”
ब्रॅण्ड आपल्या विकासाला अधिक गती देत असताना सेलिओ नाविन्यता, ग्राहक-केंद्रित्वाप्रती आणि आधुनिक काळातील पुरूषांशी संलग्न असलेली फॅशन वितरित करण्याप्रती कटिबद्ध आहे. गोव्यामधील विस्तारीकरण जागतिक मेन्सवेअर ट्रेण्ड्स भारतातील ग्राहकांसाठी अधिक उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.