
no images were found
थिएटर गाजवलेला झिम्मा २ चित्रपट आता पाहा घरबसल्या १८ मे ला स्टार प्रवाहवर
झिम्मा २ चित्रपटाने २०२३ हे वर्ष चांगलंच गाजवलं. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, शिवानी सुर्वै, रिंकू राजगुरु या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला. बॉक्स ऑफिस गाजवणारा महाराष्ट्राचा हा लाडका चित्रपट महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर पहाता येणार आहे. १८ मेला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर ‘झिम्मा २’ चा वर्ल्ड टेलिव्हिज प्रीमियर होणार आहे. इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ चित्रपटसुद्धा पहिल्या भागाप्रमाणेच प्रत्येकाच्या मनात एक नवीन उमेद निर्माण करेल यात शंका नाही.
गेली ४ वर्ष सातत्याने नंबर वन रहात स्टार प्रवाह वाहिनीने मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. सकस लिखाण, आपलीशी वाटणारी पात्र आणि सोबतीला उत्तम दिग्दर्शन हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वेगळेपण. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत भरभरुन मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच प्रयत्न केला आहे. दर्जेदार मालिकांप्रमाणेच अनेक दर्जेदार चित्रपट पहिल्यांदा स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळतात. तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहायला विसरु नका झिम्मा २ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार १८ मेला सायंकाळी ७.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.