
no images were found
यंदाचा माझा वाढदिवस अनेक सरप्राइजेजनी भरलेला होता! : विदिशा श्रीवास्तव
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है”मध्ये अनिता भाबीची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय असलेल्या विदिशा श्रीवास्तव यांनी नुकतेच स्वत:चा वाढदिवस साजरा केला, जेथे प्रेम, आनंदाचे वातावरण होते आणि त्यांना हृदयस्पर्शी सरप्राइजेज देखील मिळाले. त्यांनी शांतपणे वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन केले होते, पण हा दिवस संस्मरणीय ठरला, जो त्यांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहिल. या खास दिनाबाबत सांगताना विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या, “यंदाचा वाढदिवस अत्यंत स्पेशल आणि प्रेमाने भरलेला होता. इंडस्ट्रीमधील काही जिवलग मित्रमैत्रिणी माझ्यासोबत गेट-टूगेदरमध्ये सामील झाले. आम्ही सायंकाळी एकत्र आलो, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेतला. सर्व कुटुंब असल्यासारखे वाटले. पण सर्वात मोठे सरप्राइज माझी मालिका ‘भाबीजी घर पर है’च्या कुटुंबाकडून मिळाले. दिवस संपत आहे असे वाटत असताना माझे अद्भुत सह-कलाकार आणि टीमने सेटवर मला सरप्राइज दिले. त्यांनी मेकअप रूममध्ये फुले, फेअरी लाइट्स लावण्यासोबत सुरेख केक आणला होता. सर्वजण गाणी व सेलिब्रेशनमध्ये सामील झाले आणि मला खूप आनंद झाला. त्यांची संकल्पना आणि प्रयत्न पाहून मी भारावून गेले. यामधून अशा उत्साहवर्धक व प्रेमळ टीमसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी किती धन्य आहे, याची मला जाणीव झाली.
आणि हा दिवस अधिक उत्तम करण्यासाठी तिचे पती सयकने परिपूर्ण सरप्राइज दिले. अभिनेत्री म्हणाली, “सर्वात आनंदाची बाब म्हणजे माझे पती सयक माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी रांचीवरून आले. ते मोठे सरप्राइज होते. त्यांना येताना पाहून खूप आनंद झाला. घरी आणि सेटवर अशा खास व्यक्ती सोबत असल्याने मी स्वत:ला धन्य मानते. यंदा मी हे प्रेम कायम राहो आणि ही इच्छा सर्वात सुरेख पद्धतीने पूर्ण होवो अशी प्रार्थना केली.”