
no images were found
वसुधा’मध्ये नवीन नाट्य उलगडणार, !
झी टीव्हीवरील ‘वसुधा’ ही मालिका आपली रोचक कथा आणि बळकट व्यक्तिरेखा यांसह प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. ह्या मालिकेत हल्लीच नाट्य अधिक रंगतदार झाले जेव्हा चंद्रिका (नौशिन अली सरदार) वर पत्रकार परिषदेमध्ये जवळजवळ बंदूक ताणण्यात आली. आणि आता आणखी मोठे वळण पाहायला मिळणार आहे.
आता ह्या मालिकेत एका नवीन व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे. मेघा ही नवीन व्यक्तिरेखा गुणी अभिनेत्री मनदीप कौर साकारणार आहे. मेघा अतिशय सुसंस्कृत, चाणाक्ष आणि स्वतःच्या हिंमतीवर उभी राहिलेली स्त्री असून ती जिथे जाईल तिथे तिचा सन्मान होतो. ती चौहान परिवाराच्या आयुष्यात शिरेल आणि वसुधा (प्रिया ठाकूर) आणि देवांश (अभिषेक शर्मा) यांच्या आयुष्यात सगळं काही बदलून टाकेल. तिच्या प्रवेशामुळे भावनिक आव्हाने निर्माण होतील, खासकरून वसुधासाठी, जी गुप्तपणे देवांशला आपला पती मानते. चंद्रिका सुरूवातील मेघाबद्दल साशंक असली तरी तिच्यामध्ये चंद्रिकाला आपल्या तारूण्याची छबी दिसून येते आणि जेव्हा मेघाचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो तेव्हा चंद्रिकाला विश्वास वाटतो की मेघाच तिचा मुलगा देवांशसाठी सुयोग्य निवड आहे.
‘वसुधा’मध्ये सामिल होण्याबद्दल अतिशय उत्साहात असलेली मनदीप कौर म्हणाली, “‘वसुधा’चा भाग बनणे हे खरोखरीच रोमांचक आहे. सखोल भावना आणि खरी नाती यांचा शोध घेणाऱ्या मालिका मला पहिल्यापासूनच आवडत आलेल्या आहेत. मेघाच्या व्यक्तिरेखेला सुंदर स्तर आहेत आणि ही एक डायनॅमिक व्यक्तिरेखा आहे. ती अतिशय स्वतंत्र आणि यशस्वी अशी स्त्री असून ती चौहान परिवारामध्ये एका हेतूसह प्रवेश करते. ती सुरूवातीला जरी हट्टी वाटली तरी आपला प्रामाणिकपणा आणि चिकाटीमुळे शेवटी ती अख्खे कुटुंब आणि खासकरून चंद्रिकाचे मन जिंकते. मेघाचा प्रवास एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी रोमांचक असून ती मुख्य पात्रे – वसुधा आणि देवांश यांच्या नात्यात जटिलता आणते. कथेमध्ये निर्माण होत असलेल्या ह्या प्रेमाच्या त्रिकोणामुळे निर्माण होणारी रंजकता आणि नाट्य यांचा भाग बनताना मी उत्साहात आहे. ह्या उत्तम टीमसोबत काम करण्यासाठी मी उत्सुक असून त्यांनी माझे खूप छान स्वागत केले आहे. प्रेक्षकांनी मेघाचा प्रवास पाहावा यासाठीही मी रोमांचित आहे.”
ती पुढे म्हणाली, “माझ्या प्रवेशाचा प्रोमो सध्या ऑन एअर सुरू आहे आणि मला त्याबद्दल खूप सारे प्रेम मिळत आहे. मेघाचा प्रवास ऑनस्क्रीन जीवंत करताना मी उत्साहित आहे.”
नवीन नाती बनताना आणि जुन्या नात्यांची परीक्षा होत असताना मेघाचा प्रवेश हा वसुधासाठी परिवर्तनाचा क्षण असणार आहे. काय वसुधा आयुष्यभरासाठी सुखी होईल, की मेघा देवांशची पत्नी बनेल?