Home मनोरंजन नेस्ले इंडियाच्या स्वयंचलित आणि पेपरलेस वितरण केंद्राचे

नेस्ले इंडियाच्या स्वयंचलित आणि पेपरलेस वितरण केंद्राचे

4 second read
0
0
9

no images were found

नेस्ले इंडियाच्या स्वयंचलित आणि पेपरलेस वितरण केंद्राचे उद्घाटन; 

नेस्ले इंडियाने अलीकडेच महाराष्ट्रातील भिवंडी येथे आपले अद्ययावत वितरण केंद्र (डिस्ट्रिब्युशन सेंटर – डीसी) सुरू केले. तंत्रज्ञान हे प्रगतीला चालना देणारे प्रेरक बल आहे हा नेस्ले इंडियाचा दृढविश्वास या डिस्ट्रिब्युशन सेंटरच्या रूपाने साकार झाला आहे. वेअरहाऊसच्या कामकाजासाठी एक डिजिटल ट्विन किंवा डिजिटल प्रतिरूप म्हणावे असे प्लॅनिंग टूल वापरणारे नेस्ले इंडियाचे हे पहिलेच डीसी आहे, जे वेअरहाऊसच्या अधिक चांगल्या नियोजनास व सुसज्जतेस मदत करणारे आहे.

या डिस्ट्रिब्युशन सेंटरमध्ये असलेल्या सुमारे २०,००० पॅलेट पोझीशन्स आणि चॉकलेट साठविण्यासाठीचे सर्वात मोठे शीतगृह यांच्या साथीने कंपनी या उद्योगक्षेत्रातील मालाच्या पुरवठ्यासाठीच्या निकषांचा दर्जा उंचावत आहे. सात महिन्यांच्या विक्रमी काळात पूर्ण झालेले हे डिस्ट्रिब्युशन केंद्र अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यात स्वतंत्र रिपॅकिंग सेंटर आणि भाताची पहिली शटल रॅकिंग सिस्टिम ही वेअरहाऊसमधील जागेचा अधिक काटेकोरपणे वापर करण्यास मदत करणारी सघन रॅकिंग यंत्रणा यांचा समावेश आहे. याखेरीज हे डिस्ट्रिब्युशन सेंटर संपूर्णतया डिजिटली चालणारे आहे – ज्यामुळे त्याचे कामकाज पेपरलेस झाले आहे.

नेस्ले इंडियाच्या सप्लाय चेन विभागाचे प्रमुख श्री. वरुण गुप्ता म्हणाले, “कार्यक्षमता, चपळता, सुरक्षितता आणि शाश्वतता हे आमच्या पुरवठा साखळीचे अविभाज्य भाग आहेत. उत्पादन व माहितीच्या वहनामध्ये परिपूर्ण एकतानता साधत या तत्वांना साध्य केले जाते. भिवंडी डिस्ट्रिब्युशन सेंटर म्हणजे आमच्या टीमकडील नवसंकल्पना आणि लक्षणीय प्रयत्न यांचे मूर्त उदाहरण आहे, ज्यायोगे ऑप्टिमल शटल रॅकिंग, डिजिटलाइझ्ड कार्यान्वयन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर आधारित समन्वयीत नियोजन आणि आमच्या ग्राहकांसाठी आगळ्यावेगळ्या, सर्व प्रकारच्या माध्यमांद्वारे उपलब्ध सेवा यांचा मेळ साधला गेला आहे.”

“नेट झीरो उद्दीष्टांप्रती आमच्या बांधिलकीशी सुसंगती साधत, सानंद-भिवंडी मार्गावरील आमच्या २५ टक्‍के मालवाहतुकीसाठी आता पर्यायी इंधनाचा वापर केला जात आहे, ज्यामुळे हरित वायूचा उत्सर्ग कमी होत आहे व कार्यक्षमता वाढत आहे. आमच्या मालवाहतुकीमध्ये शाश्वततेशी संबंधित उद्दीष्टे आणखी मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्यासाठी आमच्या लॉजिस्टिक्स टीमने एक ‘ऑपरेशन्स कमांड हब’ आणि एक ‘लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स कॉम्पिटन्स सेंटर’ सुरू केले आहे.” ते पुढे म्हणाले.

नेस्ले इंडिया आणि तिच्या लॉजिस्टिक्स पार्टनर्समधील सातत्यपूर्ण भागीदारीमुळे हे शक्य झाले आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून नेस्ले इंडिया सानंद-भिवंडी मार्गावरील पर्यायी वाहनांची संख्या यापुढेही सातत्याने वाढवित राहील.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ

रोटरी सेंट्रलचे मिस चायवाली शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ   कोल्हापूर (प्रतिनिधी):रोटरी…