no images were found
जिल्हाधिकाऱ्यांना समज द्यावी अन्यथा…; दीपक केसरकरांना निवेदन
कोल्हापूर : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमाबाबत पत्रकारांनकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार त्यावर योग्य स्पष्टीकरण देण्याचे सोडून पत्रकारांचीच लाज काढली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या वर्तनाने संतप्त झालेल्या पत्रकारांच्या कोल्हापूर प्रेस क्लबकडून पालकमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना योग्य ती समज द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा जिल्हा असून येथे अनेकवेळा लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि पत्रकार यांच्या समन्वयातून अनेक चांगली कामे कोल्हापूरने करून दाखवली आहेत मात्र असे असतानाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडून मनमानी कारभार आणि पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल कोल्हापूर प्रेस क्लबने जिल्हाधिकारी रेखावार यांचा जाहीर निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना समज न दिल्यास प्रशासकीय बातम्यांसह कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कोल्हापूर प्रेस क्लबने निवेदनातून दिला आहे.