no images were found
शिवाजी विद्यापीठामध्ये बॅ.बाळासाहेब खर्डेकर जयंती साजरी
दि.०१ ऑगस्ट हा बॅ.बाळासाहेब खर्डेकर जयंती दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. दि.०१ ऑगस्ट २०२४ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रामध्ये बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांची १२२ वी जयंती त्यांच्या प्रतिमेस मा. कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के, मा. प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून साजरी करण्यात आली. या प्रसंगी डॉ.ए.एन.जाधव संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ, श्रीमती. एस.एस.पाटील वित्त व लेखा अधिकारी, डॉ.एस.एस महाजन वाणिज्य अधिष्ठाता, डॉ नंदकुमार मोरे,डॉ रणधीर शिंदे, डॉ शरद बनसोडे, डॉ.सचिनकुमार पाटील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र अधिविभाग, डॉ. डी.बी.सुतार बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्राचे प्रभारी संचालक, डॉ. पी.बी.बिलावर उपग्रंथपाल, डॉ. एस.व्ही. थोरात सहाय्यक ग्रंथपाल व बॅ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रातील सर्व सेवक व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.