
no images were found
एनआयटीमध्ये राष्ट्रीय करिअर सेवा मार्गदर्शन
कोल्हापूर (प्रतिनिधी):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (एनआयटी) येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करिअर सेवा (एनसीएस) यासंदर्भात एनसीएसच्या यंग प्रोफेशनल मेघना वाघ यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानास तृतीय वर्षाचे २०० विद्यार्थी उपस्थित होते. एनसीएस पोर्टल, त्यावरील रोजगार देणारे व मागणारे यांची नोंदणी प्रक्रिया, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपलब्ध रोजगार, स्टार्टअप प्रोत्साहनासाठी उपलब्ध कौशल्य विकास प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन आदी बाबतीत मेघना वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या आयोजनास एनआयटीचे संचालक डाॅ. संजय दाभोळे यांचे प्रोत्साहन लाभले. अधिष्ठाता डाॅ. नितीन पाटील यांनी मेघना वाघ यांचे स्वागत केले. प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. दिपक जगताप यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. अर्चना गायकवाड यांनी केले. यावेळी शैक्षणिक समन्वयक प्रा. प्रविण जाधव, विभागप्रमुख, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.