
no images were found
लॉजिस्टिक्समधील करिअर संधींचा विस्तार करण्यासाठी दिल्लीवेरीतर्फे ‘दिल्लीवेरी प्रशिक्षण आणि भरती कार्यक्रम’
या कार्यक्रमाद्वारे एंट्री आणि मिड-लेव्हल ऑपरेशनल रोलमधील भरतीसाठी खात्रीशीर नोकऱ्यांची हमी
सातारा : भारतातील सर्वात मोठा पूर्णत: एकात्मिक लॉजिस्टिक कंपनी दिल्लीवेरीने लॉजिस्टिक उद्योगात करिअर घडवण्यासाठी नोकरी शोधणाऱ्या तरुणांना सक्षम करण्यासाठी असलेला दिल्लीवेरी प्रशिक्षण आणि भरती कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम एंट्री आणि मिड-लेव्हल ऑपरेशनल रोलमधील भरतीसाठी हमीदार नोकऱ्यांची खात्री देतो.
गंगानगर, उज्जैन, कुरुर, पुरुलिया आणि श्रीनगर यासारख्या २५ – टियर २ आणि टियर ३ शहरांवर प्रारंभिक लक्ष केंद्रित करून कंपनी गुरुग्राम येथे ५ आठवडा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी उमेदवार निवडण्याकरता १९ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण वर्गात आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही प्रकारे होणार असून ऑपरेशनल प्रक्रिया, सॉफ्टवेअर टूल्स, सॉफ्ट स्किल्स आणि जन व्यवस्थापन या विषयांचा यात समावेश आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, भरती झालेल्यांना संपूर्ण भारतातील दिल्लीवेरी सुविधा केंद्रांमध्ये खुल्या व्यवस्थापकीय भूमिकांसाठी ऑन-बोर्ड केले जाईल.
१० वी/ १२ वी उत्तीर्ण असलेले किंवा डिप्लोमा धारक आणि मूलभूत इंग्रजी वाचन आणि लेखन क्षमता असलेले २२ ते ३२ वयोगटातील उमेदवार या कार्यक्रमासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
या उपक्रमावर भाष्य करताना दिल्लीवेरीच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी पूजा गुप्ता म्हणाल्या, “हा उपक्रम देशभरातील प्रतिभेशी जोडण्याच्या आणि भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात सुरक्षित रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. आम्ही आमच्या पहिल्या नियुक्त्य सदस्यांचे स्वागत करण्यास व त्यांच्या विकासासाठी आणि यशासाठी दिल्लीवेरी मध्ये समाविष्ट करून घेण्यास उत्सुक आहोत.”
कार्यक्रमाविषयी बोलताना दिल्लीवेरी अॅकॅडमीचे प्रमुख सुराजू दत्ता म्हणाले, “लॉजिस्टिक्समध्ये टॅलेंट पूल तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत दिल्लीवेरी अकादमीने डिझाइन केलेला हा आमचा ५ आठवड्यांचा एक सर्वसमावेशक, इन-हाऊस प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हा सर्वांगीण कार्यक्रम तरुणांना लॉजिस्टिक्समध्ये सर्वोत्तमता साध्य करण्यासाठी सर्व आवश्यक कौशल्यांसह सक्षम करेल.”