
no images were found
मिड स्वीडन युनिव्हर्सिटीच्या प्रतिनिधींची डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठास भेट:,आंतरशाखीय संशोधन केंद्राच्या कार्याचे केले कौतुक
कोल्हापूर(प्रतिनिधी):-स्वीडन येथील मिड स्वीडन युनिव्हर्सिटीमधील संशोधक डॉ. मॅग्नस हुम्मेलगार्ड आणि डॉ. मनीषा फडतरे यांनी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या आंतरशाखीय संशोधन केंद्रास (सीआयआर) भेट दिली. या दोघांनी आंतरशाखीय संशोधन केंद्राच्या कार्याचे कौतुक करत संशोधनासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, सीआयआरच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. अर्पिता पांडे – तिवारी यांच्यासोबत या प्रतिनिधींनीनी सविस्तर चर्चा केली. विद्यापीठासोबतच्या प्रारंभिक सामंजस्य करारानुसार संशोधन सहकार्य वाढवणे, तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आदान-प्रदान सुलभ करण्यावर भर देण्यात आला. विद्यापीठातील प्रगत प्रयोगशाळा, उच्चस्तरीय संशोधन कार्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन लेखांच्या प्रकाशनासह मिळवलेल्या पेटंट्सची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.
डॉ. मॅग्नस हुम्मेलगार्ड आणि डॉ. मनीषा फडतरे यांनी विद्यापीठातील संशोधन पातळी आणि प्रयोगशाळेतील अत्याधुनिक सुविधा यांचे विशेष कौतुक केले. भविष्यातील संशोधन सहयोगाच्या संधींसाठी दोन्ही संस्थांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि मिड स्वीडन युनिव्हर्सिटी यांच्यातील शैक्षणिक व संशोधन सहकार्य बळकट करण्यासाठी ही भेट एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. विज्ञान क्लबच्या सचिव डॉ. अर्पिता पांडे तिवारी यांनी स्वागत केले तर डॉ विश्वजीत खोत यांनी आभार मानले. यावेळी सी. आय. आर. विभागाचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा व कुलसचिव व्ही. व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.