Home मनोरंजन “सजना” चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला !!

“सजना” चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला !!

0 second read
0
0
8

no images were found

“सजना” चित्रपटाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला !!

भारतीय संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारा “सजना” चित्रपटाचा टायटल साँग प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रेमातील हळव्या भावनांना स्पर्श करत, या गीतामध्ये प्रेमातील गोडवा, आठवणी, आणि नात्यांमधील निखळपणा अगदी हृदयस्पर्शी पद्धतीने मांडण्यात आला आहे. गाण्याचं चित्रिकरण देखील अत्यंत नयनरम्य आहे.
सुप्रसिद्ध गायक सोनू निगम आणि राजेश्वरी पवार यांच्या भावस्पर्शी आवाजात सजलेले हे गाणं प्रेमाची नाजूक आणि गहिरं भावना व्यक्त करते. या गाण्याला संगीत दिलं आहे ओंकारस्वरूप यांनी, तर गाण्याचे बोल लिहिले आहेत सुहास मुंडे यांनी. “सजना” हे गाणं केवळ एक संगीतकृती नसून, प्रेमाच्या भावना, आठवणी आणि नात्यांची गुंफण उलगडणारं एक सुंदर चित्रण आहे. गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
‘सजना’ ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित एक प्रेमकथा आहे. या चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे ह्यांनी केली आहे तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन सुद्धा शशिकांत धोत्रे ह्यांनी केलं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत प्रेम, भावना आणि संगीत यांचं अनोखं मिश्रण घेऊन येणारा “सजना” हा नवा चित्रपट २३ मे २०२५ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुलकर्णी व चार्मी शहा अजिंक्य तर रिधान करवा व खुशी सोनटक्के उपविजेते

कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुलकर्णी व चार्मी शहा अजिंक्य तर रिधान करवा…