
no images were found
कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेत अद्वैत कुलकर्णी व चार्मी शहा अजिंक्य तर रिधान करवा व खुशी सोनटक्के उपविजेते
तारदाळ (प्रतिनिधी):- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने इचलकरंजी चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या सात वर्षाखालील मुला-मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा तारदाळ येथे संपन्न झाल्या.या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार पार पडल्या.या स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये 26 खेळाडू आणि मुलींच्या गटामध्ये 11 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
मुलांच्या गटात सहा तर मुलींच्या गटात चार फेऱ्या घेण्यात आल्या.
मुलांच्या गटामध्ये कोल्हापूरचा अद्वैत कुलकर्णी सहा पैकी सहा गुण मिळवून अजिंक्य ठरला तर इचलकरंजीचा रिधान करवा ने पाच गुणासह उपविजेतेपद मिळविले. मुलींच्या गटामध्ये इचलकरंजीच्या चार्मी शहा ने चार पैकी चार गुण मिळवून तर कोल्हापूरच्या खुशी सोनटक्के ने(कोल्हापूर ) तीन गुणासह उपविजेतेपद संपादिले.
हे चौघेजण 5 व 6 मे 2025 दरम्यान पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुले व मुलीच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
मुले आणि मुली दोन्ही गटातील विजेत्यांना व उपविजेत्यांना अनुक्रमे रोख एक हजार व पाचशे रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन
प्रसाद खोबरे ( जिल्हा परिषद सदस्य )
अंजना शिंदे( तालुका पंचायत सदस्य)
तुळशीदास गंगधर ( माजी सरपंच )
यशवंत वाणी ( माजी सरपंच )
सचिन पवार ( माजी भारत निर्माण सचिव तारदाळ )
चंद्रकांत तांबवे ( ग्रामपंचायत सदस्य )
नयन कुमार कांबळे ( ग्रामपंचायत सदस्य )
प्रवीण पाटील ( ग्रामपंचायत सदस्य ) नितीन खोचरे (ग्रामपंचायत सदस्य) यांच्या हस्ते पार पडला.
तुळशीदास गंगधर ( माजी सरपंच ) आणि अंजना शिंदे (तालुका पंचायत सदस्य) यांच्या हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला.
निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना स्पर्धा खेळण्यासाठी संघटनेचा टी-शर्ट व राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे.याव्यतिरिक्त प्रत्येक गटात 8 मेडल्स उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून दिले आहे.
मुलांच्या गटामध्ये आयुष माने, स्वयम चव्हाण, कौशिक राजज्ञ, रेयांश शेडसाळे, वर्षिक माने, सार्थक माने, श्लोक सोळंकी व सुयोग काकाणी तर मुलीच्या गटामध्ये
अन्वी पांडव, साक्षी निर्मळे, नित्या काबरा, अन्वी बजाज, श्रेया पाटील, वाणी मालू, इनाया मुजावर,नक्षत्रा कांबळे यांना मेडल देऊन सन्मानित केले.
या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून करण परीट सहाय्यक पंच म्हणून शैलेश होणकट्टी व शंकर आडम यांनी काम पाहिले
स्पर्धा संपन्न करण्यासाठी कपिल ठोमके, सम्मेद पाटील, प्रियंका ठोमके, श्रुती देसाई, वर्षा होनकट्टी यांनी अथक परिश्रम केले.