
no images were found
हिंदु राष्ट्रच्या स्थापनेसाठी देशभरात 20 हजारांहून अधिक भाविकांकडून ’सामूहिक हनुमान चालीसा पठण’
कोल्हापूर – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्थेच्या वतीने आज देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या निमित्ताने ठिकठिकाणी असलेल्या श्री हनुमान मंदिरे, श्रीराम मंदिरे यांसह अन्य शेकडो ठिकाणी 20 हजारांहून भाविक, साधक, हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले. यात समविचारी संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योजक, विचारवंत आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीही सहभागी झाली होती. तसेच विविध या पठणाच्या कार्यक्रमात उत्साहपूर्ण सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यात 100 हून अधिक ठिकाणी एक हजारांहून अधिक हिंदूंनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
29 मार्च या दिवशी शनिगोचर अर्थात् श्री शनिदेवानी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला आहे. या शनिगोचरचा भाविकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होण्यासाठी देशभरात सामूहिक श्री हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम घेण्यात आला. श्री हनुमान चालिसा पठणाच्या वेळी श्री हनुमंत आणि श्री शनिदेव यांच्या चरणी हिंदु राष्ट्राची लवकरात लवकर स्थापना होण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या उपक्रमात सहभागी झालेल्या अनेकांनी आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ घेतला, तसेच राष्ट्र आणि धर्म कार्य करतांना अशा उपक्रमांतून ऊर्जा मिळाल्याचे मनोगत भाविकांनी व्यक्त केले.